जमीन दस्तावेजात फेरफार, टोम्बो वहीची पानेही गायब : तिघा संशयितांनी कृत्य केल्याचा पत्रकार परिषदेत आरोप
म्हापसा : दोन दिवसांपूर्वीच ईडीने आसगाव जमीन घोटाळा प्रकरणी उद्योजक शिवशंकर मयेकर, पंच सदस्य सुदेश पार्सेकर व यशवंत सावंत यांच्या कार्यालय व निवासस्थआनावर छापे मारून मोठ्या प्रमाणात बेहिशोबी मालमत्ता कागदपत्रे तसेच लाखो ऊपये रोख हस्तगत केल्याची बातमी चर्चेत असतानाच आता आसगाव कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन या संशयितांनी व इतरांनी मिळून बनावट कागदपत्रांच्या आधारे 1.64 चौरस मीटर जमिनीचा घोटाळा करून या जागा परस्पर घेतल्या असल्याचा आरोप कोमुनिदादचे अॅटर्नी नेल्सन फर्नांडिस यांनी केला आहे. आसगाव कोमुनिदादच्या मालकीच्या पोर्तुगीजकालीन दस्तऐवजात खोटेपणा करुन तसेच कोमुनिदादच्या टोम्बो वहिचे जमीन नोंदवही पान फाडून आणि इतर कागदपत्रामध्ये फेरफार करून तब्बल 1 लाख 64 हजार चौमीटर जागा हडप करण्यात आली असल्याचे फर्नांडिस यांनी यावेळी आसगाव कोमुनिदादचे अध्यक्ष ऊईल्डो डिसोझा, इआन डिसोझा, जेराल्ड डिसोझा व अॅङ अभिजीत नाईक यांच्या उपस्थितीत सांगितले.
याबाबत अधिक माहिती देताना नेन्सन फर्नांडिस म्हणाले की, पहिल्या जमीन हडप प्रकरणाक पंच सुदेश व सुप्रिया यांनी आसगावमधील 1 लाख चौरस मीटर जागेतील आसगाव कोमुनिदादच्या कागदपत्रांत कथित फेरफार करून जमीन लाटण्याचा प्रयत्न केला. याला कोमुनिदादने विरोध करून याप्रकरणी ‘एसआयटी’कडे मार्च 2023मध्ये तक्रार केली होती. दुसऱ्या प्रकरणात, आसगाव कोमुनिदादच्या मालकीची 18,600 चौरस मीटर जागा अशाचप्रकारे लाटण्याचा प्रयत्न झाला. समाजसेवक म्हणणारे संशयित वनिता व शिवशंकर यांचा यामागे हात असल्याचा आरोप नेल्सन फर्नांडिस यांनी केला. या संशयितांनी आसगावमधील वरील जागा फसवणूक करून हस्तांतरित केली. तसेच संशयितांनी एका अभियांत्रिकी विद्यालयाला दानधर्म केलेल्या जागेत हस्तक्षेप केला. अभियांत्रिकी विद्यालयाला दान केलेल्या 3,825 चौरस मीटर आगेवर संशयितांनी दावा करीत, वरील विद्यालयाविऊद्ध संशयितांनी खोटी तक्रार दाखल केली असा आरोप नेल्सन फर्नांडिस यांनी केला.
तिसऱ्या घटनेत आसगात कोमुनिदादची 5,260 चौरस मीटर जागा संशयित यशवंत मीनाक्षी व इतरांनी कोमुनिदादचे नाव या सर्व्हे क्रमांकामधून कथितरित्या काढून टाकले. याप्रकरणी कोमुनिदाने संबंधितांच्या म्युटेशन प्रक्रियेला सबरजिस्ट्रारसमोर विरोध केल्याची माहिती नेल्सन यांनी दिली. चौथ्या प्रकरणात संशयित यशवंत सावंत यांनी कोमुनिदादची 44,740 चौरस मीटर जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही नेल्सन यांनी केला. टोम्बी वही आम्ही एसआयटीकडे दिली. या वहीतील सर्व मजकूर हा पोर्तुगीज भाषेत लिहिलेला आहे. तसेच काही खोटे पोर्तुगीजकालीन दस्तऐवज तयार केल्याचे हस्तलेखन तज्ञाकडून आम्ही ओळखले, असा दावा नेल्सन फर्नाडिस यांनी केला. मुळात ही जागा आसगाव कोमुनिदादची आहे. वरील संशयितांकडून कोणीही जागा खरेदी किंवा व्यवहार करू नये. अन्यथा अशा खोटारड्या लोकांशी हातमिळवणी करून मालमत्ता खरेदी करणारेच आर्थिकरित्या अडचणीत येतील, असे नेल्सन फर्नांडिस यांनी स्पष्ट केले.









