वृत्तसंस्था / बायेल (स्वीस)
2025 च्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील शुक्रवारपासून येथे खेळविण्यात येत असलेल्या विश्व गट-1 लढतीत दक्षिणेश्वर सुरेशने पदार्पणातच पहिल्या एकेरी सामन्यात स्वीसच्या किमचा सरळ सेट्समध्ये पराभव करत भारताला आघाडी मिळवून दिली.
यजमान स्वीस आणि भारत यांच्यात ही लढत खेळविली जात आहे. पुरूष एकेरीच्या पहिल्याच सामन्यात दक्षिणेश्वरने जेरोमिक किमचा 7-6 (7-4), 6-3 असा पराभव केला. या विजयामुळे भारताने स्वीसवर 1-0 अशी आघाडी मिळविली आहे. या स्पर्धेसाठी भारतीय डेव्हिस संघाचे नेतृत्व रोहीत राजपाल करत आहे.









