वृत्तसंस्था / एलअल्टो (बोलिव्हिया)
मंगळवारी दक्षिण अमेरिकन पात्रता फेरीत मिग्वेल टेरसेरोसने पेनल्टीवरुन गोल केला आणि बोलिव्हियाने ब्राझीलचा 1-0 असा पराभव केला. यासोबतच कोलंबियाने व्हेनेझुएलावर विजय मिळवल्यामुळे बोलिव्हियन संघ 2026 च्या विश्वचषकासाठी प्लेऑफमध्ये स्थान मिळविले.
2019 नंतर पहिल्यांदाच घरच्या मैदानावर ब्राझीलचा पराभव करणाऱ्या बोलिव्हियन संघासाठी 45 व्या मिनिटाला टेरसेरोसने गोल केला. प्लेऑफ स्पर्धेत सहा देशांचा समावेश असेल आणि पुढील वर्षी अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी शेवटचे स्थान निश्चित करण्यासाठी मार्चच्या आंतरराष्ट्रीय विंडोमध्ये हा सामना खेळवला जाईल. बोलिव्हियाचा एक्@ण चौथा आणि 1994 नंतरच्या पहिल्या विश्वचषकासाठी पात्रता मिळवण्याचा मानस आहे.
गेल्या आठवड्यात पराग्वे, कोलंबिया आणि उरुग्वे हे पुढील वर्षीच्या विश्वचषकासाठी पात्र ठरणारे सर्वात अलिकडील द.अमेरिकन संघ होते आणि पात्रता फेरीत तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या कोलंबियन संघाने व्हेनेझुएलावर 6-3 असा विजय मिळवला. स्ट्रायकर लुईस डियाझने चार गोल केले. डियाझने 42 व्या, 50 व्या आणि 67 व्या मिनिटाला गोल केले. 10 व्या मिनिटाला येरी मिना आणि 75 व्या मिनिटाला झोन कॉर्डोबानेही गोल केले.
मंगळवारीही पहिल्या हाफच्या अखेरीस एनर व्हॅलेन्सियाने पेनल्टी किकवर गोल केला आणि इक्वेडोरने विद्यमान विजेत्या अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव केला. 35 वर्षीय व्हॅलेन्सियाने 45 व्या मिनिटाला इक्वेडोर संघासाठी गोल केला जो दक्षिण अमेरिकन क्रमवारीत अर्जेटिनाच्या 38 गुणांपेक्षा 29 गुणांनी मागे राहिला. गेल्या गुरूवारी घरच्या मैदानावर शेवटचा अधिकृत सामना खेळणाऱ्या मेस्सीलाही यश मिळाले नाही. दरम्यान उरुग्वेने चिलीविरुद्ध गोलरहित बरोबरी साधून पात्रता स्पर्धा संपवली आणि पराग्वेने पेरुचा 1-0 असा पराभव केला.









