वृत्तसंस्था / नवी दिल्ली
झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्यात तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला 26 सप्टेंबरपासून प्रारंभ होत आहे. आयसीसीच्या पुरूषांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी आफ्रिका विभागीय 2025 च्या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून ही मालिका आयोजित केली आहे.
बुलावायोच्या क्विन्स स्पोर्ट्स मैदानावर हे तीन सामने खेळविले जाणार आहेत. पुढील वर्षी आयसीसीची पुरूषांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाने भूषविली जाणार आहे. दरम्यान आफ्रिका विभागीय पात्र फेरी स्पर्धेत एकूण 8 संघांचा समावेश आहे. या पात्र फेरी स्पर्धेतून आघाडीचे दोन संघ पुढील वर्षीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरतील. 26 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार आहे. तसेच नामिबियाबरोबर झिम्बाब्वेचे तीन सामने 15, 16 आणि 18 सप्टेंबरला आयोजित केले आहेत.
झिम्बाब्वे संघ: सिकंदर रझा (कर्णधार), बेनेट, ब्युरेल, इव्हॉन्स, गेवांदू, मापोसा, मेरुमणी, वेलिंग्टन्स मासाकेझा, मुनयोंगा, मुसेकिवा, मुझारबनी, मेयर्स, निगरेव्हा, ब्रेंडॉन टेलर आणि सिन विलियम्स.









