नवी दिल्ली :
ऑनलाइन गुंतवणूक प्लॅटफॉर्म कंपनी ग्रोव्ह यांना आपला आयपीओ लॉन्च करण्यासाठी शेअर बाजारातील नियामक सेबी यांच्याकडून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आयपीओ सादरीकरणाच्या प्रक्रियेला येत्या काळात वेग येणार आहे. मे 2026 मध्ये ग्रोव्ह कंपनीने आयपीओकरिता सेबीकडे रीतसर कागदपत्रांसह अर्ज दाखल केला होता. सदरच्या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 700 दशलक्ष ते 1अब्ज डॉलर्सची उभारणी करू शकते.









