बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते बेळगावच्यावतीने बेळगाव शहर तालुकास्तरीय हँडबॉल स्पर्धा नुकत्याच झाल्या.यामध्ये ठळकवाडी क्लस्टर झोनचे बालिका आदर्श विद्यालयाचा हँडबॉल व व्हॉलीबॉल संघाने आतुलनिय कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संत मिरा इंग्लिश मिडियम शाळा अनगोळ येथे संपन्न झाल्या. यामध्ये बालिका आदर्श स्कूलने उपांत्य सामन्यात महंतेशनगर झोन मधील भरतेशला 7-1 अशा फरकाने पराभव केले व अंतिम फेरी गाठली, अंतिम सामना पॅम्प झोन मधील सेंट झेव्हियर्सला 8-0 आशा फरकाने हरवून प्रथम क्रमांक मिळविला. या हँडबॉल संघात वैष्णवी नावगेकर, वृषाली छपरे, प्रतिज्ञा मोहीते, अनन्या अनगोळकर, ऋतूजा सुतार, शिवानी शेलार, गीता शिंदे, समृद्धी पाटील, साक्षी खांदारे, सेजल धामणेकर, श्र्रद्धा कणबरकर यांचा समावेश आहे.
शिवानी शेलारने अंतिम सामन्यात सर्वाधिक 4 गोल केले व ऋतुजा सुतारने 2, श्र्रद्धा कणबरकर 1, सेजल धामणेकरने प्रत्येकी 1 गोल केले, तर व्हॉलीबॉल स्पर्धेत भरतेश शाळेच्या संघाला पहिल्या सेटमध्ये 15-6 आणि दुसऱ्या सेटमध्ये 15-8 अशा फरकाने पराभूत करुन बालिका आदर्शने अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामना पॅम्प झोनमधील वनिता विद्यालयाला पहिल्या सेटमध्ये 15-7 व दुसऱ्या सेटमध्ये 15-11 आशा फरकाने हरवून प्रथम क्रमांक पटकावला.व्हॉलीबॉल संघात यशस्वी यळ्ळूरकर, श्रेया मजूकर, संचिता पाटील, श्रावणी पाटील, प्रज्ञा नेसरकर, देवयानी शास्त्री, दुर्वा आंबेवाडीकर, मानसी यळ्ळूरकर, यांचा संघात समावेश आहे. भरतेश शिक्षण संस्थेचे पदाधिकारी यांच्या हस्ते विजेत्या संघाला चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.या संघाला शाळेचे चेअरमन आनंद गाडगीळ, मुख्याध्यापक एन. ओ. डोणकरी व मंजुनाथ गोलीहळ्ळी यांचे प्रोत्साहन तर क्रीडाशिक्षक उमेश बेळगुंदकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.









