महाव्दार रोड या मुख्य मिरवणूक मार्गाची पाहणी तिघांनी केली
कोल्हापूर : सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक मार्गाची जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी आणि पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी बुधवारी पाहणी केली. रस्त्यातील अडथळे, खड्डे, झाडांच्या फांद्या आदी दूर करण्याच्या सूचना संबंधितांना यावेळी दिल्या. गर्दीच्या संभाव्य ठिकाणी बंदोबस्तासह इतर यंत्रणा तैनात ठेवण्याबाबतही यावेळी चर्चा झाली.
अनंत चतुर्दशी अवघ्या दोन दिवसांवर आली आहे. तरीदेखील मिरवणूक मार्गातील खड्डे अद्यापी बुजविण्यात आले नाहीत. ते खड्डे त्वरित मुजवून घ्यावे. तसेच काही ठिकाणी झांडाच्या फांद्या रस्त्यावर आलेल्या आहेत. त्या झांडाच्या फांद्याची छाटणी करावी.
मिरवणूक मार्गाच्याकडेला अनेक दिवस उभी असलेली वाहनांने हलवावीत, अशा सूचना पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी यावेळी केली. पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी बुधवारी सांयकाळी मिरजकर तिकटी ते इराणी खणीपर्यंतच्या रस्त्याची पाहणी केली. तसेच महाव्दार रोड या मुख्य मिरवणूक मार्गाची पाहणी तिघांनी केली.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू, पोलीस उपअधीक्षक तानाजी सावंत, शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर यांच्यासह शहरातील पोलीस ठाण्याचे प्रभारी महापालिकेचे अधिकारी, महावितरणचे अधिकारी उपस्थित होते. शहरातील मुख्य विसर्जन मिरवणूक मिरजकर तिकटीपासून सुरू होते.
त्यानंतर ही मिरवणूक महाव्दार रोड, पापाची तिकटी, गंगावेश, रंकाळा बस स्थानकापासून पुढे इराणी खणीकडे जाते. त्यामुळे या मुख्य मिरवणूक मार्गाची या जिल्हाधिकारी, एसपी आणि प्रशासक यांनी फिरती केली. मागील तीन वर्षापासून उमा टॉकीज ते हॉकी स्टेडियम हा पर्यायी विसर्जन मार्ग सुरू करण्यात आला आहे.
या मार्गावरुन अधिकाधिक मंडळांनी वापर करावा, गर्दीचे विभाजन करावे अशी सूचना यावेळी देण्यात आली. दोन्ही मिरवणूक मार्गावर एकाच वेळी गर्दी होणार नाही. मिरवणूक पहायला येणाऱ्यांना त्रास होणार याबाबत चोख नियोजन करण्याचे यावेळी ठरले. विसर्जन मार्गावर टॉवरसह सीसीटीव्हीच्या माध्यमातून वॉच ठेवला जाणार आहे.
पाहणी दरम्यान मिरजकर तिकटी चौकालगत रस्त्यावर लहान मोठे खड्डे पडल्याचे दिसून आले. विसर्जन मिरवणूक दोन दिवसांवर आली आहे. तरीसुध्दा महानगरपालिकेने येथील खड्डे बुजवलेले नसल्याचे उघडकीस आले. हे खड्डे पाहून पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना खड्डे तत्काळ बुजवण्याबाबत सूचना केल्या.
मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी झांडाच्या फांद्याची छाटणी करण्याबाबत विद्युत महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगितले. मिरवणूक मार्गाच्या दोन्ही बाजुला अडथळा करणारी जी वाहने उभी आहेत. ती सर्व वाहने मिरवणूकपूर्वी बाजुला करण्याच्या सूचना केल्या.








