वडगावचे अष्टविनायकनगर मंडळ ठरले महाविजेता
बेळगाव : शिवसेना सीमाभागाच्यावतीने सुंदर गणेशमूर्ती स्पर्धा-2025 चे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव दक्षिण व उत्तर अशा दोन मतदारसंघात झालेल्या स्पर्धेमध्ये अष्टविनायकनगर, येळ्ळूर रोड, वडगाव येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने महाविजेता होण्याचा मान मिळविला. उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर, तालुका प्रमुख सचिन गोरले, प्रवीण तेजम, राजू तुडयेकर यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
बेळगाव दक्षिण विभागात प्रथम- राजहंस गल्ली, अनगोळ येथील श्रीराम युवक मंडळ, द्वितीय- रघुनाथ पेठ,अनगोळ येथील गणेशोत्सव मंडळ, तृतीय- धारवाड रोड, संभाजी रोड, जोशी मळा, पाटील गल्ली, ओमनगर, खासबाग गणेशोत्सव मंडळ, चतुर्थ- पवार गल्ली, शहापूर, पाचवा- जोशी गल्ली, शहापूर. बेळगाव उत्तर विभागात प्रथम- संभाजी गल्ली, महाद्वार रोड, द्वितीय- छत्रपती शिवाजीनगर पाचवी, सहावी व सातवी गल्ली, तृतीय- छत्रपती शिवाजीनगर पहिला, दुसरा, चौथा, पाचवा व सहावा क्रॉस, चतुर्थ- ताशिलदार गल्ली, पाचवा- कुलकर्णी गल्ली-शेरी गल्ली मंडळांनी क्रमांक मिळविले.
वडगाव येथे बुधवारी स्पर्धेचे बक्षीस वितरण पार पडले. स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रदीप सुतार, मयुरेश काकतकर, अमर कडगावकर, महिपाल इतापाचे यासह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









