अव्वर सचिव रघुराज फळदेसाई यांनी काढला आदेश
पणजी : कर्तबगार आयएएस अधिकारी डॉ. लेव्हीन्सन मार्टिन यांची गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचा आदेश कार्मिक खात्याचे अव्वर सचिव रघुराज फळदेसाई यांनी काल मंगळवारी काढला. डॉ. लेव्हीन्सन मार्टिन्स हे कामगार आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांची या ठिकाणाहून गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याने ते लवकरच मंडळाचा पदभार स्वीकारणार आहेत. डॉ. मार्टिन्स हे एजीएमयुटी कॅडरचे भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी आहेत. ते गोवा सरकारचे कामगार आणि रोजगार आयुक्त म्हणून काम करत होते. उत्तर गोव्यातील साळगाव येथे शाश्वत कचरा घनकचरा व्यवस्थापन सुविधेमध्ये (जैव ते वीज)
आणि दक्षिण गोव्यातील काकोडा येथे 100 टीडीपी तसेच सामान्य बायोमेडिकल आणि धोकादायक कचरा प्रक्रिया संयंत्रे उभारण्यात ते अग्रणी आहेत. डॉ. मार्टिन्स यांच्या असाधारण सेवेबद्दल 2011 मध्ये त्यांना जनगणनेच्या कामासाठी भारताच्या राष्ट्रपतींनी रौप्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. मार्टिन्स यांनी गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून कचरा व्यवस्थापनात पीएचडी, मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी, राज्यशास्त्रात एमए, एलएलबी आणि एमबीए केले आहे. त्यांनी गोव्यातील मुरगाव येथे उपविभागीय दंडाधिकारी म्हणूनही काम केले आहे. तिथे त्यांनी मानवी तस्करी रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. ज्यासाठी त्यांना मुसोरी येथील लाल बहादूर शास्त्राr राष्ट्रीय प्रशासन अकादमी येथे अधिकाऱ्यांना संबोधित करण्यासाठी अनेक वेळा आमंत्रित करण्यात आले होते.









