जवळपास 2000 कोटींची उभारणी करणार : अन्य 12 कंपन्यांनाही मान्यता
वृत्तसंस्था/ मुंबई
सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने स्पीकर आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट निर्माता बोटच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (आयपीओ) ला मान्यता दिली आहे. बॉटची मूळ कंपनी इमॅजिन मार्केटिंग लिमिटेडने एप्रिल 2025 मध्ये आयपीओसाठी गोपनीयपणे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल केला होता. बोट व्यतिरिक्त, सेबीने अर्बन कंपनी, ज्युनिपर ग्रीन एनर्जीसह एकूण 13 कंपन्यांच्या आयपीओला मान्यता दिली आहे.
2000 कोटींचा आयपीओ
आयपीओचा एकूण आकार 2000 कोटी रुपये असू शकतो. कंपनीचे मूल्यांकन सुमारे 13,000 कोटी रुपये असू शकते. या वेळच्या आयपीओमध्ये नवीन शेअर इश्यू आणि विक्रीसाठी ऑफरची माहिती अद्याप सार्वजनिक केलेली नाही. कंपनीचे शेअर्स बीएसई आणि एनएसई वर सूचीबद्ध केले जातील.
आयपीओ लाँच तारीख, किंमत तपशीलाबाबत
कंपनीने 2022 मध्येही आयपीओसाठी अर्ज केला होता. शेअर बाजारात उतरण्याचा हा बोटचा दुसरा प्रयत्न आहे. जानेवारी 2022 च्या सुरुवातीला कंपनीने 2000 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी ड्राफ्ट पेपर्स दाखल केले होते. यामध्ये 900 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स आणि 1,100 कोटी रुपयांचे ऑफर फॉर सेल (ओएफएस) समाविष्ट होते.
पण त्यावेळी बाजाराची स्थिती चांगली नसल्याने कंपनीने आपली योजना पुढे ढकलली. यावेळी कंपनीने गोपनीय प्री-फाइलिंग मार्गाचा अवलंब केला आहे.
अमन गुप्ता आणि समीर मेहतांचा वाटा
इमॅजिन मार्केटिंगची स्थापना अमन गुप्ता आणि समीर मेहता यांनी 2013 मध्ये केली होती आणि बोट ब्रँड 2014 मध्ये लाँच झाला. बोट यांची हेडफोन्स, स्मार्टवॉच आणि ऑडिओ उत्पादने लोकप्रिय आहेत.









