दुबईतील स्कॅनर होतोय व्हायरल
दुबईच्या सुपरमार्केट्समध्ये आता अत्याधुनिक गॅझेट्सचा वापर होतोय. यातील सर्वात आकर्षक फ्रूट रिपनेस स्कॅनर आहे. हाताच्या आकाराचे हे उपकरण फळ खाण्यायोग्य आहे की नाही, सांगते. हे यंत्र आता ग्राहकांसाठी आकर्षणाचे मोठे केंद्र ठरले आहे. हे उपकरण फळाला स्कॅन करून त्यातील मजबुती आणि शूगरलेव्हल मोजते. त्यानंतर स्क्रीनवर तीन रंगात निष्कर्ष दिसतात, हिरवा रंग म्हणजे फळ अजून कच्चे आहे, तर पिवळा रंग फळ खाण्यायोग्य झाले आहे आणि लाल रंगाचा अर्थ ओवररिप म्हणजे फळ खूपच पिकले आहे. खास म्हणून हा स्कॅनर फळ कुठल्या कामासाठी सर्वात चांगले ठरेल, हे देखील सांगतो.
हे उपकरण भविष्यात जगभरातील सुपरमार्केट्समध्ये मल्टी-फ्रूट स्पॅनर म्हणून सादर होऊ शकते. दुबईत मोहम्मद बिन जायेद युनिव्हर्सिटी ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजेन्सने एक स्ट्रॉबेरी पिकर रोबोट देखील विकसित केला आहे. हा रोबोट मशीन लर्निंग आणि कॉम्प्युटर व्हिजनच्या मदतीने पिकलेल्या स्ट्रॉबेरीला हळूवारपणे तोडतो, यामुळे फळाचे नुकसान होत नाही.









