बेळगाव :
इदलहोंड येथील एका किराणा दुकानातून पंधरा लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी अबकारी अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असून एका महिलेवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सुवर्णा नायक यांच्या किराणा दुकानात गावठी दारू विक्री करण्यात येत असल्याचे समजताच अबकारी उपअधीक्षक रवी मुरगोड, दुंडाप्पा हक्की, सुनील पाटील, प्रवीण हुळ्ळी, सय्यद जलानी आदींचा समावेश असलेल्या पथकाने किराणा दुकानावर छापा टाकून रबर ट्युबमधील 10 लिटर व प्लास्टिक कॅनमधील 5 लिटर गावठी दारू जप्त केली. सुवर्णा यांना अबकारी कायद्यांतर्गत नोटीस देण्यात आली आहे.









