रोमियो चित्रपटात मुख्य भूमिका
शाहिद कपूर स्वत:चा आगामी चित्रपट ‘रोमियो’वरून चर्चेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल भारद्वाज करत आहेत. या चित्रपटासोबत आता तमन्ना भाटियाचे नाव जोडले गेले आहे. तमन्ना यात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.
अॅक्शन-थ्रिलर चित्रपटात तमन्ना भाटिया दिसून येणार आहे. हा चित्रपट चालू वर्षीच प्रदर्शित होणार असल्याचे समजते. शाहिद कपूरसोबत या चित्रपटात तृप्ति डिमरी देखील दिसून येणार आहे. याचबरोबर या चित्रपटात तमन्नाही काम करणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. तमन्नाने या चित्रपटातील स्वत:च्या हिस्स्याचे चित्रिकरण पूर्ण केले आहे. विशाल भारद्वाजचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा कमर्शियल चित्रपट असल्याचे सांगण्यात येत आहे. विशाल भारद्वाज यांनी ‘7 खून माफ’, ‘हैदर’, ‘कमीने’, ‘पटाखा’, ‘खुफिया’ यासारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाते. तर ‘रोमियो’ चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करत आहेत. या चित्रपटाचे पोस्टर लवकरच प्रदर्शित केला जाणार आहे. तर चित्रपट 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.









