शाहजहांपूर
उत्तरप्रदेशच्या शाहजहांपूर येथे एका कर्जात बुडालेला व्यापारी आणि त्याच्या पत्नीने प्रथम स्वत:च्या 3 वर्षीय मुलाला विष पाजून त्याचा जीव घेतला आणि मग दोघांनी गळफास लावून स्वत:चे आयुष्य संपविले आहे. पोलिसांना घटनास्थळावर 33 पानी सुसाइड नोट मिळाली असून त्या आधारावर चौकशी सुरू करण्यात आली आहे. मृतांची नावे सचिन ग्रोवर, त्याची पत्नी शिवांगी आणि 3 वर्षांचा मुलगा फतेह अशी आहेत. सचिनवर 50 लाख रुपयांचे कर्ज झाले होते. सचिनने जिल्हा उद्योग केंद्रातून कर्ज घेतले होते, त्याकरता त्याना अनुदान मिळणार होते, परंतु याकरता उद्योग केंद्राचे अधिकारी 50 टक्के लाच मागत होती असा आरोप त्याच्या परिवाराच्या सदस्यांनी केला आहे.









