गोरखपूर :
उत्तरप्रदेशच्या गोरखपूरमध्ये 23 ऑगस्ट रोजी झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी आम आदमी पक्षाचे नेते कुंज बिहारी निषाद यांचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यानंतर निषाद यांच्या कुटुंबीयांनी रुग्णलयावर उपचारात निष्काळजीपणा केल्याचा आरोप दगडफेक केली आहे. या दगडफेकीत एक पोलीस जखमी झाला आहे. निषाद यांना एका आर्थिक व्यवहाराच्या प्रकरणातून मारहाण झाली होती.









