लखनौ :
इंडी आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी मंगळवारी लखनौ येथे जात समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतली आहे. ही निवडणूक हार किंवा विजयाची नसून तत्वांची असल्याचे म्हणत रेड्डी यांनी भाजपवर निवडणुकीला विचारसरणीच्या आधारावर विभागण्याचा आरोप केला आहे. उत्तरप्रदेशातून निवडून आलेल्या नेत्यांचे समर्थन मिळविणार असून यात अखिलेश यादव यांची साथ लाभल्याचे रेड्डी यांनी म्हटले आहे.









