उत्खननात आले समोर
पुरातत्व तज्ञांचे पथक अनेकदा रहस्यांची उकल करत असते आणि त्याच्याशी निगडित खुलासे करत असते. बीजान्टिन सिटी थौरस हे शतकांपासून पुरातत्वतज्ञांसाठी एक रहस्य ठरले होते. या शहराला मदबा मोजेक नकाशावर स्पष्ट स्वरुपात दर्शविण्यात आले होते, परंतु याचे अचूक स्थान अज्ञात होते. आता संशोधकांच्या एका टीमने अनेक वर्षांचे संशोधन आणि फील्डवर्कनंतर सुमारे 1500 वर्षे जुन्या या शहराचा दक्षिण जॉर्डनमध्ये शोध लावला आहे. हा शोध प्राचीन इतिहास आणि त्या काळातील जीवन समजून घेण्यास महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरू शकतो. डॉ. मुसल्लम आर अल-रावहनेह यांच्या नेतृत्वात पुरातत्वतज्ञांनी 2021-24 दरम्यान फील्ड सर्वे, ऐतिहासिक ग्रंथ आणि स्थानिक रहिवाशांच्या मदतीने या प्राचीन शहराच्या ओळखीची पुष्टी केली आहे.
थारैसचे महत्त्व केवळ एक शेतीयोग्य वसाहतीपेक्षा अधिक आहे. हे मदबा नकाशावर प्रामुख्याने अस्तित्वात आहे. हे एक पवित्र स्थळ आणि एक व्यापारी विश्रांती स्थळ होते. या ठिकाणी उत्खननात बीजान्टिन शैलीच्या बेसिलिकाचे अवशेष मिळाले आहेत. यात मोजेक फरशीचे तुकडे, नक्षीदार दगडी प्रवेशद्वार आणि मोठ्या दरवाजांवरील दगड सामील आहे. हे स्पष्टपणे ख्रिश्चन समुदायाच्या उपस्थितीचे पुरावे देणारे आहे. याचबरोबर पुरातत्वतज्ञांना याठिकाणी मातीच्या भांड्यांचे तुकडे, दगडी अवजार, काचेचे तुकडे अणि जीवाश्मही मिळाले आहेत.
या ठिकाणच्या सर्वात महत्त्वपूर्ण शोधांमध्ये काही थडग्यांवर प्राचीन ग्रीक आणि लॅटिन शिलालेख सामील आहेत. यातील अनेक 5 व्या ते 7 व्या शतकातील आहेत. मोआबाइट पठार आणि मृत समुद्रादरम्यान शहराच्या रणनीतिक स्थितीने या ऐतिहासिक व्यापार मार्गांवर एक महत्त्वपूर्ण थांब्याचे स्वरुप दिले होते. धार्मिक आणि वाणिज्यिक दृष्ट्या या शहराची दुहेरी भूमिका होती, याचमुळे बीजान्टिन युगात थारैस प्रमुख होते. शहर त्या काळात व्यापारी आणि सांस्कृतिक आदान-प्रदानचे महत्त्वपूर्ण केंद्र राहिले असावे. परंतु 7 व्या शतकापर्यंत थारैस निर्जन ठरत गेल्याचे तज्ञांचे सांगणे आहे. भूकंप, हवामान बदल आणि राजेशाहीत परिवर्तनामुळे लोकांना हे ठिकाण सोडणे भाग पडले असावे, असे मानले जात आहे.









