नवी दिल्ली :
निर्यात विक्रीमध्ये जास्तीत जास्त हिस्सेदारी प्राप्त करण्याच्या उद्देशाने हिंदुजा समूहातील प्रमुख भारतीय कंपनी अशोक लेलँड यांनी पश्चिम आशिया देशांमध्ये विस्तार करण्याचे नियोजन केले आहे. अशोक लेलँड सौदी अरबमध्ये वाहन निर्मिती कारखाना सुरू करणार आहे. यामध्ये इलेक्ट्रिक बस, हलकी ट्रक सारखी वाहने आणि इतर वाहने असेंबल केली जाणार आहेत. 2025-26 हे कंपनीसाठी निर्यातीकरता चांगले असणार आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये पाहता कंपनीच्या वाहन निर्यातीमध्ये 30 टक्के इतकी वाढ पाहायला मिळाली आहे. जवळपास 15,255 वाहनांची निर्यात कंपनीने सदरच्या आर्थिक वर्षामध्ये केली होती. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतदेखील वाहन निर्यात 29 टक्के इतकी वाढीव पाहायला मिळाली.









