कुठल्या रोगात कोणता गंध येतो यावर संशोधन
बॉडी ओडर म्हणजेच शरीराच्या गंधाला केवळ घाम किंवा सफाईशी जोडले जाते. परंतु नव्या संशोधनानुसार मानवी शरीरातून निघणारा गंध आरोग्याच्या मोठ्या रहस्याला उघड करू शकतो. बॉडी ओडरद्वारे पार्किंसन, मलेरिया आणि कॅन्सर यासारख्या आजारांचेही निदान करता येऊ शकते, असे वेगवेगळ्या अध्ययनातून स्पष्ट झाले आहे.
पार्किंसनचा ‘स्मेल सिग्नेचर’
पार्किंसनला आतापर्यंतच्या सर्वात अवघड आजारांमध्ये गणले जाते, कारण याचे प्रारंभिक निदान अत्यंत कठिण असते. परंतु युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टरच्या वैज्ञानिकांनी मोठा शोध लावला आहे. त्यांनी पार्किंसन रुग्णांच्या त्वचेतून निघणाऱ्या सेबमचे मास स्पेक्ट्रोमेट्रीद्वारे विश्लेषण केले आहे. यात सुमारे 30 असे वोल्टाइल ऑरगॅनिक कम्पाउंड्स (व्हीओसीज) आढळून आले, जे केवळ पार्किंसन रुग्णांमध्ये होते. यात ईकोसेन आणि ओक्टाडेकॅनल यासारखे खास कम्पाउंड सामील आहेत. हा शोध अत्यंत महत्त्वपूर्ण असून यामुळे केवळ एका स्कीन स्वॅब चाचणीद्वारे 3 मिनिटात पार्किंसनचे निदान करता येऊ शकते. प्राध्यापक पेर्डिटा बॅरन यांनी एखाद्या आजाराला त्याच्या गंधाद्वारे अत्यंत अचूकपणे ओळखणे पहिल्यांदाच शक्य झाल्याचे म्हटले आहे.
मलेरिया अन् मुलांचा गंध
2018 मध्ये केनियात झलोल्या एका अध्ययनात 56 मुलांचे फूट-ओडर नमुने घेण्यात आले होते. यात मलेरिया संक्रमित मुलांच्या शरीरातून हेपटॅनल, ओक्टानल आणि नोनानल नावाचे एल्डेहायड्से अधिक प्रमाणात निघत असल्याचे आढळून आले. हाच गंध एकप्रकारचा प्र्रूटी-ग्रासी स्मेल तयार करतो, जो डासांना खासकरून आकर्षित करतो. म्हणजेच हा गंध केवळ आजाराचा संकेत देत नाही, तर आजार फैलावण्याचे एक महत्त्वाचे सूत्रही आहे.
श्वानांपेक्षा तीव्र आर्टिफिशियल नाक
श्वान स्वत:च्या हुंगण्याच्या क्षमतेद्वारे पॅन्सरसारख्या आजारांची ओळख पटवू शकतात, असे आंतरराष्ट्रीय अध्ययनांमधून समोर आले आहे. एका संशोधनात श्वानांनी प्रोस्टेट कॅन्सरच्या 99 टक्के प्रकरणांची योग्य ओळख पटविली. आता एमआयटीशी संबंधित वैज्ञानिक आंद्रेस मर्शिन यांच्या टीमने याच आधारावर रियलनोज डॉट एआय प्रकल्प सुरू केला आहे. यात मानवी ओलफॅक्टरी रिसेप्टर्स आणि मशीन लर्निंगला मिळून एक असे आर्टिफिशियल नाक तयार केले जात आहे, जे मानवापेक्षा अधिक अचूक पद्धतीने गंध ओळखू शकेल. मशीनचे नाक श्वानापेक्षा चांगले असावे आणि कुठल्याही आजाराचे निदान हुंगून करू शकेल असे आमचे लक्ष्य असल्याचे मर्शिन यांनी सांगितले.
लाभदायक संशोधन
शरीराचा गंध आजाराचा प्रारंभिक अलार्म असू शकतो. रक्तचाचणी किंवा बायोप्सीशिवाय निदानाचा नवा मार्ग खुला होत आहे. आगामी काळात डॉक्टर संबंधितांच्या गंधाद्वारे आजाराचे निदान करू शकतात असे वैज्ञानिकांचे सांगणे आहे.
कुठल्या आजारात कोणता गंध
मधुमेह : रुग्णाच्या शरीर किंवा श्वासातून फळांसारखा (रोट्टन अॅपल) गंध येत असेल तर हे रक्तात कीटोन बॉडीज वाढण्याचा संकेत असू शकतो.
यकृत आजार : शरीर आणि श्वासातून सडलेले अंडे किंवा सल्फरसारखा गंध येऊ लागतो.
मूत्रपिंड विकार : श्वासातून मासे किंवा अमोनियासारखा गंध
क्षयरोग : श्वासातून शिळी बियर अणि त्वचेतून ओलसरपणा सारखा गंध
मलेरिया : मुलांच्या त्वचेतून गवतासारखा गंध, डासांना आकर्षित करतो.
पार्किंसन : शरीरातून तीव्र, जुन्या लाकडासारखा गंध









