वृत्तसंस्था/ काबूल,
युएईमध्ये 9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप टी-20 स्पर्धेसाठी फिरकी गोलंदाजांचा भरणाअ असणाऱ्या अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व रशीद खानकडे सोपविण्यात आले आहे. कर्णधाराव्यतिरिक्त संघात नूर अहमद, मुजीब उर रहमान, एएम गझनफर आणि अनुभवी अष्टपैलू मोहम्मद नबी या स्पिनर्सचा समावेश आहे.
अफगाणिस्तानने गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. झिम्बाब्वेविरुद्ध खेळलेल्या संघातून हजरतुल्लाह झझाई आणि झुबैद अकबरी यांना वगळण्यात आले आहे. रहमानउल्लाह गुरबाज आणि मोहम्मद इशाक हे दोन विकेटकीपर फलंदाज आहेत. वेगवान आक्रमणात नवीन-उल-हक, फजलहक फारुकी आणि फरीद मलिक यांचा समावेश आहे. ब गटात अफगाणिस्तान, बांगलादेश, हाँगकाँग आणि श्रीलंका यांचा समावेश करण्यात आला आहे तर भारत, ओमान, पाकिस्तान आणि यूएई अ गटात आहेत. रशीदच्या नेतृत्वाखालील संघ 9 सप्टेंबर रोजी हाँगकाँगविरुद्ध आशिया कप मोहिमेची सुरुवात करेल.
अफगाण संघ : रशीद खान (क), रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम झद्रन, दरविश रसूली, सेदीकुल्लाह अटल, अजमतुल्लाह उमरझाई, करीम जनात, मोहम्मद नबी, गुलबदीन नायब, शरफुद्दीन अश्रफ, मोहम्मद इशाक, नूर अहमद, मुजीब उर रहमान, एएम गझनफर, फरीद मलिक, फरीद अहमद मलिक, फरीद मलिक, फरीद नवाब. राखीव खेळाडू : वफिउल्लाह तरखिल, नांगेलिया खरोटे, अब्दुल्ला अहमदझाई.









