‘आयएडीडब्ल्यूएस’ यंत्रणा : डीआरडीओला मोठे यश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑपरेशन सिंदूर नंतर, भारत सतत आपल्या लष्करी क्षमता मजबूत करण्यात गुंतलेला आहे. आता देशाने बहुस्तरीय हवाई संरक्षण प्रणालीच्या क्षेत्रात एक मोठी झेप घेत संरक्षण संशोधन विकास संघटनेने (डीआरडीओ) एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणालीची (आयएडीडब्ल्यूएस) पहिली यशस्वी चाचणी केली. ही हवाई संरक्षण प्रणाली महत्वाच्या वैशिष्ट्यांनी सुसज्ज असून शत्रूच्या हवाई धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरेल. ही चाचणी नुकतीच ओडिशाच्या किनाऱ्यावर करण्यात आल्याची घोषणा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी ‘एक्स’वर एक फोटो पोस्ट करून केली आहे.
इंटिग्रेटेड एअर डिफेन्स वेपन सिस्टीम (आयएडीडब्ल्यूएस) ही एक बहुस्तरीय हवाई संरक्षण प्रणाली आहे. त्यात अनेक स्वदेशी क्षेपणास्त्रs आणि एक शक्तिशाली लेसर शस्त्र देखील समाविष्ट आहेत. ही प्रणाली शत्रूच्या हवाई हल्ल्यांपासून देशाचे संरक्षण करण्यास सक्षम आहे. ‘आयएडीडब्ल्यूएस’मध्ये क्विक रिअॅक्शन सरफेस टू एअर मिसाईल, अॅडव्हान्स्ड व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टम क्षेपणास्त्रs आणि डायरेक्टेड एनर्जी वेपन यांचा समावेश आहे.
डायरेक्टेड एनर्जी वेपन (डीईडब्ल्यू) हे लेसरसारखी ऊर्जा वापरणारे शस्त्र आहे. ते शत्रूची लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रs हवेत पाडण्यास सक्षम आहे. डीआरडीओने या यशाबद्दल भारतीय सशस्त्र दलांचे आणि त्यांच्या विकासकांचे अभिनंदन केले आहे. ही अनोखी उ•ाण चाचणी देशाची बहुस्तरीय हवाई संरक्षण क्षमता स्थापित करते.
ही हवाई चाचणी आपल्या देशाची बहुस्तरीय हवाई संरक्षण क्षमता स्थापित करते आणि शत्रूच्या हवाई धोक्यांपासून महत्त्वाच्या सुविधांसाठी क्षेत्राचे संरक्षण मजबूत करणार आहे. या प्रणालीच्या आगमनाने भारताची हवाई संरक्षण प्रणाली आणखी मजबूत होईल. विशेषत: शत्रूच्या हवाई हल्ल्यांपासून देशाचे संरक्षण करण्यासाठी ती उपयुक्त ठरेल, असा दावा केला जात आहे.
चीन-पाकिस्तानला कडक इशारा
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने ज्या पद्धतीने कामगिरी केली त्याची जगभरात चर्चा झाली. हजारो पाकिस्तानी ड्रोन हवेत पाडल्याने भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेसमोर पाकिस्तानची ताकद कुचकामी ठरली. त्याचवेळी, आता ‘आयएडीडब्ल्यूएस’च्या यशस्वी चाचणीमुळे आपली हवाई संरक्षण यंत्रणा अधिक मजबूत झाली आहे. हे यश चीन आणि पाकिस्तानसारख्या शत्रूराष्ट्रांसाठी मोठा इशारा मानला जात आहे.
‘आयएडीडब्ल्यूएस’ची वैशिष्ट्यो….
एअर डिफेन्स वेपन सिस्टम ही एक बहुस्तरीय हवाई संरक्षण प्रणाली
ही प्रणाली शत्रूच्या हवाई हल्ल्यांपासून देशाचे संरक्षण करण्यास सक्षम
या प्रणालीत अनेक स्वदेशी क्षेपणास्त्रs व एक शक्तिशाली लेसर शस्त्र
ड्रोनसह हाय-स्पीड विमाने व हवेतील क्षेपणास्त्रांना पाडण्यासही सक्षम
स्वयंचलित तंत्रज्ञानावर आधारित असल्याने धोके शोधून हल्ला करते









