गणेशचतुर्थी-विसर्जन दरम्यान आदेश लागू
बेळगाव :
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशचतुर्थी व श्री विसर्जनाच्या एक दिवस आधीच बेळगाव शहर व तालुक्यात मद्यविक्री बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी शुक्रवारी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. बुधवार दि. 27 ऑगस्ट रोजी गणेशचतुर्थी आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवार दि. 26 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून गुरुवार दि. 28 ऑगस्टच्या सकाळी 6 पर्यंत बेळगाव शहर व तालुक्यात बार, वाईनशॉप, क्लब व हॉटेलमध्ये दारूविक्री व वाहतुकीवर बंदी असणार आहे.
याबरोबरच श्री विसर्जन मिरवणुकीच्या आधी 5 सप्टेंबरच्या सायंकाळी 6 पासून 8 सप्टेंबरच्या सकाळी 6 पर्यंत शहर व तालुक्यात दारूविक्री बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित ठेवण्यासाठी हा आदेश देण्यात आला आहे.









