रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ला शाखेत 50 लाख ऊपयांचा अपहारप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या तिघांपैकी एका संशयिताला अटक केल़ी तर अन्य दोघे जण पसार झाल्याचे समोर येत आह़े अमोल आत्माराम मोहिते (42, ऱा टिके रत्नागिरी) असे अटक केलेल्याचे नाव आह़े शुक्रवारी त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
ग्राहकांनी बँकेकडे तारण ठेवलेले 50 तोळे सोने लंपास केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी बँकेचा शिपाई अमोल माहिते, शाखाधिकारी किरण विठ्ठल बारये, कॅशियर ओंकार अरविंद कोळवणकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यातील अमोल याला पोलिसांनी शुक्रवारी सकाळी अटक केल़ी तर अन्य दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आल़ा पोलिसांकडून होणाऱ्या अटकेचा सुगावा लागताच दोघेही संशयित पसार झाल़े दरम्यान पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आह़े
जिल्हा मध्यवर्ती बँकेत ग्राहकांकडील सोने तारण ठेवून त्या बदल्यात कर्ज देण्यात आले होत़े 18 फेब्रुवारी ते 4 ऑगस्ट 2025 दरम्यानच्या काळात तिजोरीमधील सोने लंपास केल्याचा प्रकार समोर आला होत़ा त्यानुसार सुऊवातीला बँकेकडून यासंबंधी चौकशी करण्यात आली होत़ी यानंतर बँकेचे अधिकारी सुधीर प्रभाकर गिम्हवणेकर (54, ऱा माळनाका रत्नागिरी) यांनी रत्नागिरी शहर पोलिसात तक्रार दाखल केली होत़ी त्यानुसार पोलिसांनी प्राथमिक तपास करून तिघांविऊद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 316 (2),(4),(5), 3(5) नुसार गुन्हा दाखल केल़ा संशयित आरोपींनी संगनमत करून सुमारे 50 तोळे सोने ज्याचे बाजारभावाप्रमाणे 50 लाख ऊपये इतके मूल्य होत आह़े आरोपींनी लंपास केलेले सोने नेमके कुठे ठवले अथवा त्याचे काय केले, याबाबत माहिती पोलिसांकडून घेतली जात आह़े काही दागिने पोलिसांच्या हाती आल्याचे सांगण्यात आले. मात्र अन्य दोन आरोपी पोलिसांच्या हाती आल्यानंतर उर्वरित सोन्याच्या दागिन्यांची माहिती मिळू शकेल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.








