वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय महिला संघातील माजी फिरकी गोलंदाज गौहर सुलतानाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. भारताचे प्रतिनिधीत्व करताना गौहर सुलतानाने वनडे सामन्यात 19.39 धावांच्या सरासरीने 66 गडी बाद केले आहेत.
गौहर सुलतानाने वनडे या क्रिकेटच्या प्रकारात 2009 साली आणि 2013 साली झालेल्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. या दोन्ही विश्वचषक क्रिकेट स्पर्धांमध्ये तिने 11 सामन्यांतून 30.58 धावांच्या सरासरीने 12 बळी मिळविले. गौहर सुलतानाने 2009 ते 2014 या कालावधीत झालेल्या आयसीसीच्या तीन महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करताना 5.81 धावांच्या सरासरीने 7 बळी घेतले आहेत. महिलांच्या 2024 सालातील प्रीमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत युपी वॉरियर्स संघाने गौहर सुलतानाशी करार केला होता. सध्या 30 वर्षीय गोहर सुल्तान ही बीसीसीआयची श्रेणी दोनमधील प्रशिक्षक आहे.









