पंतप्रधान मोदी यांचा ममता बॅनर्जी यांच्यावर आरोप
वृत्तसंस्था / कोलकाता
पश्चिम बंगालच्या विकासासाठी केंद्र सरकार जो पैसा पाठवित आहे, त्याची उधळण या राज्यातील तृणमूल काँग्रेसचे सरकार तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर करीत आहे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ते सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असून जाहीर सभेत त्यांनी हा आरोप केला. त्यांच्या हस्ते मेट्रो आणि महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आले.
केंद्र सरकार राज्याला भरपूर धनसाहाय्य करीत आहे. तथापि, या पैशापैकी मोठ्या वाट्याची राज्य सरकारकडून लूट केली जाते. लुटलेला हा पैसा तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर खर्च केला जातो. कार्यकर्त्यांना पोसण्यासाठी या राज्यातील सत्ताधारी या पैशाचा दुरुपयोग केला जातो. त्यामुळे राज्यातील अनेक गरीबहिताच्या योजना धूळ खात पडून आहेत. राज्यातील गरीबांना त्यांचा कोणत्याही लाभ होत नाही , असा गंभीर आरोप त्यांनी या सभेत केला आहे.
राज्याला भरभरुन सहाय्य
मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वातील सरकारने पश्चिम बंगालसाठी जितक्या प्रमाणात निधी दिला, त्याच्या दुप्पट निधी आमच्या सरकारने गेल्या दहा वर्षांमध्ये दिले. तथापि, हे धन सर्वसामान्यांपर्यंत किंवा गरीबांपर्यंत पोहचतच नाही. राज्य व्यवस्थेकडून त्याचे शोषण केले. त्यातून तृणमूल काँग्रसचे भरण-पोषण होत आहे. राज्याच्या रेल्वेलाही सध्याच्या केंद्र सरकारकडून गेल्या दहा वर्षांमध्ये मागच्या सरकारच्या तुलनेत तिप्पट अधिक धन मिळत आहे. हे राज्य भारतातील मोठ्या लोकसंख्येच्या काही राज्यांपैकी एक आहे., अशी टिप्पणी त्यांनी केली.
विकसित भारतासाठी आवश्यक
पश्चिम बंगाल भारतातील एक मोठे राज्य असल्याने त्याचा सर्वांगिण विकास झाल्याखेरीज विकसीत भारताचे स्वप्न साकार होणार नाही. ज्यावेळी बंगालचा उत्कर्ष होईल, त्याचवेळी भारत विकसीत राष्ट्र होणार आहे. या राज्याचा विकास करण्याचा पूर्ण प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. तथापि, येथील राज्य सरकार विकासाच्या संदर्भात पूर्ण उदासीन आहे. त्यामुळे केंद्र सरकारने केलेले प्रयत्नही वाया जात आहेत, या बाबीवर त्यांनी आपल्या भाषणात भर दिला.
श्रद्धा आणि विकास दोन्ही आवश्यक
सध्या या राज्यात दुर्गापूजा उत्सावाची सज्जता करण्यात येत आहे. त्यामुळे येथील वातावरण भक्तीमय झाले आहे. तथापि, श्रद्धेप्रमाणे विकासही राज्याच्या हितासाठी आवश्यक आहे. श्रद्धापर्वाला विकासपर्वाची जोड मिळाल्यास राज्यातील जनतेचे हित झपाट्याने होईल, अशी आमची भूमिका आहे. राज्याच्या विकासासाठी विकासाभिमुख सरकार येण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
विविध प्रकल्पांचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी कोलकाता मेट्रो प्रकल्पाच्या सहाव्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले. तसेच एका महामार्ग प्रकल्पाची कोनशीलाही त्यांच्या हस्ते स्थापन करण्यात आली. हा सहा पदरी महामार्ग असून तो कोलकाता शहर आणि कोलकाता बंदर यांना एकमेकांशी जोडणार









