लोणंद :
मंगळवार 19 रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास लोणंद-फलटण रोडवर कापडगाव येथील शिवार हॉटेलसमोर मालट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. या भीषण अपघातात फिरोज दुलरखान दरवेशी (वय 34, रा. पाचसर्कल साखरवाडी, ता. फलटण) यांचा मृत्यू झाला असून त्यांचे मेहुणे अमीन बाबा खान शेख (वय 47, रा. ढेबेवाडी, ता. पाटण) गंभीर जखमी झाले आहेत.
फिरोज दरवेशी व त्यांचे मेहुणे शेख हे शिरवळ येथून साखरवाडी येथे जात असताना ही दुर्घटना घडली. अज्ञात मालट्रक चालकाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दोघे गंभीर जखमी झाले. तत्काळ त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र दरवेशी यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अमीन शेख यांनी लोणंद पोलिसांत फिर्याद दिली आहे.








