वार्ताहर/कणकुंबी
शिक्षण खात्याच्या वतीने घेण्यात येणाऱ्या देवलत्ती क्लस्टर शालेय क्रिडास्पर्धा लोकोळी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयाच्या मैदानावर स्पर्धेचे उद्घाटन समारंभा करण्यात आले यावेळी श्री.चांगळेश्वरी शिक्षण मंडळाचे संस्थापक चेअरमन वाय एन मजुकर उपस्थित होते. या स्पर्धेच्या कार्यक्रमाची मुलीनी स्वागतगीताने सुरुवात झाली. प्रास्ताविक व स्वागत श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचे मुख्याधापक एस एम येळ्ळूरकर यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व फोटो पूजन करण्यात आले. ध्वजारोहण निवृत्त सैनिक सुरेश परीट तर क्रीडाज्योतची प्रांरभी निवृत्त सैनिक रवींद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन निवृत्त सैनिक श्रीमंत पाटील व प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वाय एन मजुकर यांनी बोलताना म्हणाले की, वाचन हे मनाचे पोषण आहे व खेळ हे शरीराचे पोषण असते. खेळामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तित्व सुदृढ व प्रभावी होते.यावेळी संस्थेचे सचिव प्रसाद मजुकर, ग्रा. प. सदस्य तुकाराम चव्हाण, संजय पाटील, ग्रा.प. पि. डी. ओ. विनोद मुतगी तसेच सी. आर. पी. एस. सांबरेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.









