पाहण्यासाठी लोक करतात गर्दी
एका शॉपिंग मॉलमध्ये सर्वप्रकारची सामग्री दिसून येते. सर्वसाधारणपणे मॉलमध्ये विक्रीच्या सामग्रीसोबत काही अदभूत गोष्टी शोसाठी ठेवण्यात येतात, यामुळे लोकांना मॉलमध्ये आल्यावर चांगले अन् दिलासादायक वाटू शकते. परंतु एखाद्या मॉलमध्ये मोठा खडक ठेवण्यात आल्यास काय घडू शकते? युरोपयी देश एस्टोनियाच्या एका शॉपिंग मॉलमध्ये एक मोठा खडक ठेवण्यात आला आहे. इस्टोनियाच्या हाबनेमे शहर कावीम्सी शॉपिंग मॉलमुळे सध्या चर्चेत आहे. या शॉपिंग मॉलमध्ये मोठा खडक असून तो इमारतीच्या मधोमध आहे. लोक भाज्या, फळे, ग्रॉसरी आणि कपडे खरेदी करण्यासाठी जात असलेल्या सुपरमार्केटमध्ये तो आहे. या इस्टोनियन सुपरमार्केटचा खडक जवळपास 22 मीटर व्यासाचा आण 6 मीटर उंचीचा आहे, ज्यात जमिनीत दाबलेला हिस्साही सामील आहे.
लोकांच्या आकर्षणाचे केंद्र
हा खडक लोकांच्या खरेदीयात्रेचे एक प्रमुख आकर्षण ठरला आहे. हा खडक शॉपिंग सेंटर तयार होण्यापूर्वी हजारो वर्षांपूर्वी तेथे होतो. हा खडक जवळपास 10 हजार वर्षे जुना आहे. सप्टेंबर 2014 मध्ये इमारतीसाठी पाया खणला जात असताना याविषयी कळले होते. प्रथम मजुरांनी हा खडक डायनामाइटद्वारे उडविण्याची योजना आखली होती, परंतु स्थानिक लोकांनी याला विरोध दर्शविला होता.
कशाप्रकारचा खडक
हा विशाल खडक प्रत्यक्षात एक ‘इरॅटिक बोल्डर’ असल्याचे नंतर समोर आले. हा असा दुर्लभ खडक आहे, ज्याला संरक्षित वारशाचा दर्जा मिळू शकतो. हा खडक प्रत्यक्षात ग्लेशियर कापून तयार होतात आणि वाहून दूर अंतरापर्यंत पोहोचतात आणि वितळल्यावर तेथेच सोडून देतात. यामुळे हा खडक आसपासच्या खडकांपेक्षा वेगळ्या प्रकारची संरचना असलेला खडक ठरतो. तर आसपासचे खडक स्थानिक संरचनेचे असतात. अशाप्रकारचे खडक अनेकार्थाने दुर्लभ आणि मूल्यवान ठरतात.
हा खास
एस्टोनियात अशाप्रकारचे अनेक इरॅटिक बोल्डर आहेत, परंतु विम्सी शॉपिंग सेंटरमधील हा खडक सुमारे 10 हजार वर्षांपूर्वी निर्माण झाला होता. पृथ्वीवर मागील हिमयुग संपत असतानाचा हा कालावधी होता. अशास्थितीत हा खडक हिमयुगाच्या काळातील महत्त्वाची माहिती स्वत:मध्ये सामावलेला असू शकतो.









