आचरा प्रतिनिधी
आचरा गावात सबस्टेशन असूनही ऐन चतुर्थी सणाच्या तोंडावर आचरा हिर्लेवाडी येथील वारंवार खंडीत वीज पुरवठ्यामुळे संतप्त झालेले हिर्लेवाडी ग्रामस्थ बुधवारी आचरा बाजारपेठ येथील कार्यालयात दाखल झाले होते. हिर्लेवाडी भागातील वीज सातत्याने खंडीत होत असून वीज गेल्यावर काहीवेळा दिवसभर वीज गायब असते अशी स्थिती कायम राहिल्यास गणेश चतुर्थी उत्सवातील कामे आम्ही कशी पूर्ण करणार असा सवाल करत विद्यूत समस्यांचे निराकरण न झाल्यास आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा दिला.यावेळी आचरा विकास मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग वायंगणकर, विनोद मुणगेकर, संजय वायंगणकर, समिर बावकर, भगवान मुणगेकर, रवींद्र मुणगेकर, मोहन तोंडवळकर, तळीराम पेडणेकर, संदीप तांडेल, संजय तांडेल, गणेश पेडणेकर, यतीन पेडणेकर, विजय वायगंणकर, दिपक पेडणेकर, मुणगेकर, बाळा मयेकर, शेखर मुणगेकर, संभाजी शिर्सेकर, व ग्रामस्थ उपस्थित होते.हिर्लेवाडी परिसरात गेले काही दिवस वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. याचा फटका बसत असून नुकसान सहन करावे लागत आहे. ऐन चतुर्थी सणाची कामे अडकून पडली असून वीज नसल्याने गणपती शाळा चालवणाऱ्यांवर लाईट वरील कामे होत नसल्याने कामाचा ताण वाढला असल्याचे ग्रामस्थ म्हणाले. हिर्लेवाडी भागात सुमारे 300 हुन अधिक घरे असून 400 घरे आहेत या सगळ्यांना एकाच ट्रान्सफार्मर वरून सप्लाय होत असून कमी दाबाचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. उपस्थित अधिकाऱ्यांनी येत्या दोन दिवसात आपल्या भागाची पाहणी करून लवकरच समस्या दुरु करण्यात येईल असे सांगत सर्व ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली.









