वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2025 च्या प्रो कबड्डीलीग हंगामासाठी विद्यमान विजेत्या हरियाणा स्टीलर्स कबड्डी संघाच्या कर्णधारपदी जयदीप दाहीयाची तर उपकर्णधारपदी राहुल सत्पालची नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत हरियाणा स्टीलर्स कबड्डी संघाची कामगिरी दर्जेदार होत आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेत कर्णधार दाहीया तसेच उपकर्णधार सत्पाल आणि प्रमुख प्रशिक्षक मनप्रित सिंग यांनी हरियाणा स्टीलर्सला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली, असे या संघाचे सीईओ दिव्यांशु सिंग यांनी म्हटले आहे.
बाराव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेसाठी हरियाणा स्टीलर्स संघ- नवीन कुमार, शिवम पाठारे, विनय तेवातिया, शहेनशहा मोहम्मद, घनशाम मगर, मयांक सैनी, जयसूर्या एन.एस., विशाल ताटे, विकास जाधव, जयदीप दाहीया (कर्णधार), राहुल सत्पाल (उपकर्णधार), राहुल अहिरी, ऋतिक गुर्जर, झुबेर मलिक, हरदीप कांडोला, अंकीत धुल, सचिन दाहीया, एन. माणिकनंदन, आशिष नरवाल, साहील नरवाल.









