सियाचिन
लडाखच्या सियाचिन क्षेत्रात कर्तव्य बजावताना अग्निवीर सैनिक अरुण यांना हौतात्म्य प्राप्त झाले आहे. फायर अँड फ्यूरी कॉर्प्सचे जनरल ऑफिसर कमांडिंग आणि सर्व रँक अग्निवीर अरुण यांना सलाम करतात, ज्यांनी 18 ऑगस्ट रोजी सियाचिनमध्ये कर्तव्य बजावताना बलिदान केले आहे. या दु:खाच्या क्षणी आम्ही त्यांच्या परिवाराबद्दल संवेदना व्यक्त करतो असे सैन्याने एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे.









