विविध ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन
बेळगाव : श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी भाविकांची शिवमंदिरांमध्ये गर्दी झाली होती. शहरासह उपनगरांत पावसाची रिपरिप सुरू असतानाही मंदिरांमध्ये मात्र भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. शिवलिंगांना आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच अनेक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील कपिलेश्वर मंदिरासह अनेक मंदिरांमध्ये पहाटे अभिषेक करण्यात आला. त्याचबरोबर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सततच्या पावसामुळे दुपारच्या सुमारास भाविकांची गर्दी कमी होती. परंतु सायंकाळनंतर मंदिरे गर्दीने फुलल्याचे दिसून आले. वडगाव येथील शिवमंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याचबरोबर मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी उपवासाच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. कपिलेश्वर मंदिरमध्ये भाविकांना दर्शन सुलभ व्हावे, यासाठी मंडपाची व्यवस्था करण्यात आली होती. विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.









