बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते, गोमटेश विद्यापीठ, मजगाव,स्वाध्याय विद्यामंदिर टिळकवाडी आयोजित टिळकवाडी विभागीय व छत्रपती शिवाजी क्लस्टर शहापूर, अनगोळ, टिळकवाडी यांच्या विद्यमाने हॉकी स्पर्धेमध्ये एस.के.ई. सोसायटीच्या कन्नड शाळा माध्यमिक मुलांच्या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवला तसेच माध्यमिक मुलींच्या संघाने द्वितीय स्थान पटकावले. तर प्राथमिक विभागात मुला-मुलींच्या गटात उपविजेतेपद मिळविले. मुलांच्या गटात अंतिम सामन्यात एस. के. ई. कन्नडा संघाने हेरवाडकर स्कूलचा 2-0 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले.
एस.के.ई.तर्फे अशोक येळ्ळूरकर व हर्ष पोतदार यांनी गोल केले. मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात जी. जी. चिटणीस स्कूलने एस. के. ई. कन्नडा संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. या स्पर्धेत संघाला उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले. प्राथमिक गटात मुलांच्या अंतिम सामन्यात एम. व्ही. हेरवाडकर स्कूलने एस. के. ई. कन्नडाचा 1-0 तर मुलींच्या सामन्यात जी. जी. चिटणीस स्कूलने एस. के. ई. कन्नड स्कूलचा 1-0 असा निसटता पराभव करून प्राथमिक गटात उपविजेतेपद मिळविले. शाळेच्या मुख्याध्यापिका एस. डी. नायक, एस. व्ही. वैजनाथ मठ, गायत्री शिंदे, पी. एस. खनगावकर तसेच शाळेचे क्रीडा शिक्षक प्रवीण पाटील, रामलिंग परीट यांचे मार्गदर्शन लाभत आहे.









