वृत्तसंस्था / इपोह (मलेशिया)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे झालेल्या मलेशिया आंतरराष्ट्रीय चॅलेंज 2025 च्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची 20 वर्षीय महिला बॅडमिंटनपटू देविका सिहागने महिला एकेरीचे विजेतेपद पटकाविले.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात देविका सिहागने आपल्याच देशाच्या पाचव्या मानांकित आपल्याच देशाच्या पाचव्या मानांकित इशाराणी बारुआचा 15-7, 15-12 अशा सरळ गेम्समध्ये केवळ 25 मिनिटांत पराभव करत जेतेपदावर शिक्कामोर्तब केला. 2025 च्या जर्मनीत झालेल्या विश्वविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक मिळविणाऱ्या भारतीय संघामध्ये देविका सिहागचा समावेश होता. मलेशियात पहिल्यांदाच देविका सिहागने आंतरराष्ट्रीय दर्जाची चॅलेंज स्पर्धा जिंकली आहे. यापूर्वी तिने स्विडीश खुली आणि पोर्तुगाल आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सिहागने जेतेपद मिळविले होते.









