वृत्तसंस्था/ मुंबई
डिजिटल देवाण-घेवाणीच्या व्यवहारांमध्ये यूपीआय व्यवहारांनी ऑगस्ट महिन्यामध्ये नवा विक्रम प्राप्त केला आहे. दररोज 90 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकचा यूपीआय देवाण-घेवाणीचा व्यवहार करण्यामध्ये यश प्राप्त झाले असल्याचे समजते. एसबीआय रिसर्च यांच्या अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
2025 मध्ये पाहता यूपीआयचा वापर करून दैनंदिन व्यवहारामध्ये वाढ होताना पाहायला मिळते आहे. 75 हजार 743 कोटी रुपयांचे होणारे दरदिवशीचे व्यवहार जुलैमध्ये 80 हजार 919 कोटी रुपयांवर पोहोचले होते आणि आता ऑगस्टमध्ये 90046 कोटी रुपयांचे व्यवहार दैनंदिन स्तरावर झालेले दिसून आले आहेत. याच पद्धतीने पाहता दैनंदिन व्यवहार जानेवारी ते ऑगस्ट यादरम्यान पाहता 127 दशलक्षने वाढत 675 दशलक्षांवर पोहोचले आहेत.
एसबीआय, फोन पेचा जलवा
व्यवहारांमध्ये पाहता यूपीआयच्या माध्यमातून पैसे पाठवण्यासाठी एसबीआयचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. या बँकेच्या माध्यमातून 5.2 अब्ज देवाणघेवाणीचे व्यवहार झाले आहेत. यानंतर एचडीएफसी आणि येस बँक यांचा नंबर लागतो. यूपीआय अॅप व्यवहारांमध्ये पाहता फोन पे सर्वाधिक आघाडीवर आहे. यानंतर गुगल पे आणि पेटीएमच्या माध्यमातून ग्राहकांनी जास्तीत जास्त व्यवहारावर भर दिला होता. डिजिटल देवाण-घेवाणीच्या व्यवहारांमध्ये एनपीसीआयच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र 9.8 टक्के हिस्सेदारीसह आघाडीवर आहे. यानंतर कर्नाटक 5.5 टक्के आणि उत्तर प्रदेश 5.3 टक्केसह दुसऱ्या, तिसऱ्या स्थानावर आहेत









