सातारा :
सध्या गणपतीच्या आगमनाचे सोहळे सुरु आहेत. त्या सोहळयात बाप्पांच्या मिरवणुकीत रंगत वाढावी याकरता मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून पेपर ब्लास्ट उडवले गेले आहेत. हे पेपर ब्लास्ट धोकादायक ठरत असून कर्मचाऱ्यांनाही स्वच्छता करताना दमछाक होत आहे. वाऱ्याने हेच प्लास्टिकचा कचरा स्थानिकांच्या दुकानात, हातगाड्यावर जात आहे. त्यामुळे प्रदूषणात आणखी भर पडत आहे. त्यामुळे पर्यावरण प्रेमींकडून उत्सव साजरा करताना प्रदुषण करु नका अशी आर्जव होत आहे.
शहरात आगमन मिरवणुकांचे लोण सुरु झालेले आहे. शहराबरोबर जिल्ह्यातही हे लोण पेटलेले असून ग्रामीण भागातही आगमन मिरवणुका काढल्या जात आहेत. शहरात सहा ते सात मंडळांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. या मंडळांनी मिरवणुकीमध्ये पेपर ब्लास्टचा वापर केला. तेच पेपर ब्लास्ट राजपथावर मोती चौकापासून ते राजवाडा बसस्थानकाच्या समोर चाँदणी चौकापर्यंत पडलेले दिसून येत आहे. हे पेपर ब्लास्ट पालिकेचे कर्मचारी गेली चार दिवस झाडू मारुन स्वच्छ करत आहेत. परंतु वाऱ्याच्या वेगाने पुन्हा ते इकडे तिकडे उडून जात आहे. वजनाने हलके असल्याने ते उडून जात आहे. प्लास्टिकचा कचरा रस्त्यावर पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून हा कचरा शहरातील राजपथावर दिसून येत आहे.
- उत्सव साजरे करा, पण प्रदूषण थांबवा
सण, उत्सव साजरा करताना ते मोठ्या उत्साही वातावरणात साजरे झाले पाहिजेत. परंतु त्या उत्साहाला गालबोट लागू नये, पर्यावरणाची हानी होवू नये, प्रदुषण थांबवा उत्सव साजरे करा.
-चैतन्य दळवी








