बेळगाव : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शहरासह उपनगरात अनेक संघ संस्थांनी ध्वजारोहणाचे आयोजन केले होते. मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. काही ठिकाणी मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.
बेळगाव रेल्वेस्थानक 
बेळगाव रेल्वेस्थानकामध्ये स्टेशन मास्तर दशरथ प्रसाद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला झेडआरसीसीचे सदस्य प्रसाद कुलकर्णी, अविनयकुमार, गुरुसिद्धप्पा माळी, अमोल कोपर्डे, शिवानंद नाईक, सुरेश के., भीमाप्पा मेदार यांच्यासह रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.
सामर्थ्य व्यायाम शाळा
टिळकवाडी येथील सामर्थ्य व्यायाम शाळेच्यावतीने स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माजी नगरसेवक राजू आजगांवकर, किणेकर सर यांच्यासह व्यायाम शाळेचे प्रशिक्षक राजकुमार बोकडे, एस. बी. शेख, माजी नगरसेवक विनायक गुंजटकर, प्रविण खरडे, अजय चौगुले, विनायक धामणेकर उपस्थित होते.
संजीवनी फौंडेशन
संजीवनी फौंडेशनच्यावतीने स्वातंत्र्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते. सुभेदार मेजर शंकर देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी चेअरमन मदन बामणे, संस्थापिका डॉ. सविता देगिनाळ, डॉ. सुरेखा पोटे, डॉ. नविना शेट्टीगार यांच्यासह इतर उपस्थित होते.
शाहूनगर रिक्षास्टँड
स्वातंत्र्यदिनानिमित्त शुक्रवारी शाहूनगर येथील शेवटच्या बसस्टॉपजवळील ऑटोरिक्षा स्टँडवर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मल्लेश कांबळे, संदेश राजमनी, रेखा अंगडी, नगरसेवक श्रेयश नाकाडी, गजानन पाटील, शशिकांत गौडर आदी उपस्थित होते. महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
जिल्हा स्वातंत्र्यसैनिक संघ
बेळगाव जिल्हा स्वातंत्र्यसैनिक आणि उत्तराधिकारी संघ, स्वातंत्र्यसैनिक भवन येथे स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. कर्नाटकचे दिल्लीतील माजी विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संघाचे अध्यक्ष राजेंद्र कलघटगी, सचिव विवेकानंद पोटे, संचालक किरण बेकवाड, एस. के. पाटील, यल्लाप्पा कलखांबकर व संघाचे सभासद उपस्थित होते.
जिजाऊ महिला मंडळ
जिजाऊ महिला मंडळातर्फे स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. अनिता शंभुचे यांनी प्रास्ताविक करताना स्वातंत्र्य संग्रामात बेळगावचा सहभाग किती महत्त्वाचा होता हे स्पष्ट केले. अनंत पाटील यांनी दीपप्रज्वलन केले. लक्ष्मी उसुलकर यांनी भारतमातेच्या फोटोचे पूजन केले. बाबुराव कुट्रे यांनी श्रीफळ वाढविले. मालोजी अष्टेकर यांनी ध्वजारोहण केले. रेणुका व किरण सांबरेकर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मालोजीराव अष्टेकर यांनी अनेक वीरांबरोबरच वीरांगणांच्या त्यागामुळे स्वातंत्र्य मिळाल्याचे स्पष्ट केले. वीणा हुंदरे यांनीही आपले मत मांडले. ज्योती सुतार हिने सूत्रसंचालन केले.
शिवशक्ती युवक मंडळ
नानावाडी येथील शिवशक्ती युवक मंडळातर्फे 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे माजी सैनिक कृष्णा शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन झाले. अध्यक्ष शैलेश जानगवळी, पदाधिकारी सुजित, अमित, विष्णू, षण्मुख, सागर, संदीप, गणेश आदी उपस्थित होते.
जायंट्स मेन-सखी 
जायंट्स मेन व जायंट्स सखीतर्फे 79 वा स्वातंत्र्यदिन कपिलेश्वर येथील जायंट्स भवन आवारात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती मधुकर पाटील उपस्थित होते. जायंट्स मेनचे अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, सखीच्या अध्यक्षा शिला पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. दोन्ही संस्थांचे 50 हून अधिक सभासद व मान्यवर उपस्थित होते.
चर्मकार समाज सुधारणा मंडळ
येळ्ळूर वेस चर्मकार समाज सुधारणा युवक मंडळाच्यावतीने समाजाचे अध्यक्ष गणेश काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मिठाईचे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते दयानंद चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन किशोर पवार यांनी केले. सदानंद कदम यांनी आभार मानले.
वाङ्मय चर्चा मंडळ
वाङ्मय चर्चा मंडळातर्फे 79 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. मंडळाचे कार्यवाह विजय देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष प्रा. अनिल पाटणेकर, स्पर्धा प्रमुख माधव कुंटे, व्यवस्थापिका स्मिता कुलकर्णी, विक्रम फडके, सुधीर महाले, सुनिल भैय्या व मान्यवर उपस्थित होते.
श्री मारुती मंदिर रिक्षास्टँड
विजयनगर पाईपलाईन रोड, गणेशपूरतर्फे अध्यक्ष गजानन उसुलकर, रमेश पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
वेणुग्राम हॉस्पिटल
वेणुग्राम हॉस्पिटलच्यावतीने 79 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. सुमित दुर्गोजी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रारंभी दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. योगेश आणि सिंचना यांनी मनोगत व्यक्त केले. प्रियंका रामेत्री व सहकाऱ्यांनी समूहगीत सादर केले. यावेळी डॉक्टर, नर्स व कर्मचारी उपस्थित होते.
केएलई होमिओपॅथिक
कुडची (ता. बेळगाव) येथील केएलई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज-हॉस्पिटलतर्फे 79 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. प्रशासक डॉ. मुकुंद उडचणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यांनी आपल्या भाषणात, प्रत्येकाने देशाभिमान ठेवला पाहिजे. एकता, बंधुत्व, नवा उत्साह घेऊन कार्य केले पाहिजे. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक देशप्रेमींनी त्याग, बलिदान दिले. त्यांचे स्मरण करणे आम्हा भारतीयांचे कर्तव्य आहे. देशाभिमान, निष्ठा, एकता, बंधुत्व बाणवून देशाला विकासाच्या दिशेने नेऊया, असे सांगितले. प्राचार्य डॉ. स्वरुपा पाटील, फॅकल्टी डीन डॉ. रूपाली तेलंग, डॉ. राहुल पवार, डॉ. सोमनाथ, डॉ. राजेंद्र सगरे, डॉ. जयतीर्थ कुलकर्णी यांच्यासह प्राध्यापक,प्राध्यापकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.









