टोकियो :
जपानमध्ये शनिवारी रात्री भूकंपाचे दोन धक्के जाणवले आहेत. युनायटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्वेनुसार भूकंपाचे केंद्र जमिनीत 10 किलोमीटर खोलवर होते. एकामागोमाग एक धक्के जाणवल्याने लोकांमध्ये काहीवेळ दहशतीचे वातावरण होते. परंतु या भूकंपामुळे कुठल्याही प्रकारच्या हानीचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. भूकंपाचा पहिला धक्का जपानच्या ताकानाबे प्रांतात जाणवला. याची तीव्रता 5.7 इतकी होती. तर काही वेळानंतर 3.0 तीव्रतेचा भूकंप जाणवला होता. या भूकंपाचा प्रभाव इंडोनेशियापर्यंत जाणवला आहे.









