पिता अणि कन्या, माता आणि पुत्र किंवा बंध-भागिनी यांच्यात विवाहसंबंध प्रस्थापित करु नयेत, हा सामाजिक नियम पुढारलेल्या देशांमध्येही कटाक्षाने पाळला जात आहे. अनेक देशांमध्ये या सामाजिक नियमाला कायद्याचे संरक्षणही आहे. कारण ही नाती अत्यंत पवित्र मानली जातात. तथापि, अनवधानाने किंवा अज्ञानामुळे अशा घटना घडतात की नंतर पश्चात्ताप करण्याची वेळ येऊ शकते.
ही घटना अशी आहे, की एका मातेने अज्ञानापोटी आणि अनवधानाने आपल्या पुत्राशीच विवाह केला. पण नंतर त्यांचे खरे नाते समोर आले, तेव्हा साऱ्यांना मोठाच धक्का बसला. तीन दशकांपूर्वी या मातेने आपले एक मूल अन्य कुटुंबात दत्तक दिले होते. त्यानंतर तिचा त्याच्याशी संपर्क पूर्णत: तुटला होता. पुढे हा दत्तक मुलगा मोठा झाला. तो 22 वर्षांचा झाला तेव्हा त्याचा एका स्थानी आपल्य मातेशी परिचय झाला. पण दोघेही एकमेकांना ओळखू शकले नाहीत. परिचयाचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विवाहही झाला. इतकेच नव्हे, तर या दांपत्याला दोन मुलेही झाली. नंतर त्यांनी काही कायदेशीर बाबींसाठी साऱ्या कुटुंबाचे डीएनए परीक्षण करुन घेतले, तेव्हा तिचा पती तिने 36 वर्षांपूर्वी जन्माला घातलेला पुत्रच आहे, हे धक्कादायक सत्य समोर आले.
यानंतर, या कुटुंबात प्रचंड वादळ माजले. सारे कुटुंब जणू उद्धवस्त झाले. त्यांचे नातेसंबंध आता अशा प्रकारे बनले होते, की या महिलेला तिच्याच पुत्रापासून मुले झाली होती, त्यामुळे ती एकाचवेळी या मुलांची माता आणी आजी झाली होती. तर या मुलांचा पिता त्यांचा बंधूही होता. हा धक्का या कुटुंबासाठी असह्या होता. अखेर या दांपत्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेऊन ते एकमेकांपासून अलग झाले. तथापि, त्यांच्या मुलांचे भवितव्य सामाज आणि कायदा या दोन्ही दृष्टींनी अत्यंत गुंतागुंतीचे झाले आहे. साऱ्या कुटुंबाचे मन:स्थास्थ्य कोलमडून गेले आहे. सध्या सुरक्षेच्या कारणास्तव या दोघांची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत. तथापि, त्यांची छायाचित्रे सोशल मिडियावर प्रसिद्ध झाली असून अनेकांनी या कुटुंबाच्या भवितव्यासंबंधी सहानुभूती आणि हळहळ अशा भावना व्यक्त केल्या आहेत.









