मानवी मेंदूप्रमाणे करतो काम
वैज्ञानिकांनी एक असे संशोधन केले आहे, जे मानवी मेंदूशी संबंधित गंभीर आजार समजून घेणे अणि त्यावर उपचार शोधण्यास क्रांति घडवू शकते. अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी प्रयोगशाळेत एक छोटा मेंदू तयार केला असून त्याला ‘मिनी-ब्रेन’ म्हटले जात आहे. हा मिनी-ब्रेन मानवी मेंदूप्रमाणेच काम करतो आणि ऑटिज्म, डिप्रेशन आणि अल्झायमर यासारख्या आजारांना समजून घेण्यास मदत करू शकतो. हा मिनी-ब्रेन प्रयोगशाळेत तयार केलेले एक असे मॉडेल आहे, जे मानवी मेंदूप्रमाणे दिसते आणि काम करते. वैज्ञानिकांनी याला मल्टी-रिजन ब्रेन ऑर्गनाइज्ड (एमआरबीओ) नाव दिले आहे. हा 40 दिवसांच्या मानवी भ्रूणाच्या मेंदूसारखा दिसतो. ज्यात मेंदूचे सर्व हिस्से आणि रक्ताच्या छोट्या-छोट्या वाहिका आहेत, खास म्हणजे मानवी मेंदूप्रमाणे हा मिनी-ब्रेन इलेक्ट्रिक सिग्नल पाठवितो.
भारतासाठी संशोधन खास
भारतात ऑटिज्म आणि अल्झायमर यासारखे आजार वेगाने वाढत आहेत, आकडेवारीनुसार देशात सुमारे 1.5 टक्के मुले ऑटिज्मने प्रभावित आहेत आणि 50 लाखाहून अधिक वृद्ध अल्झायमरने ग्रस्त आहेत. या आजारांवर अचूक उपचार शोधणे अवघड ठरले आहे, कारण बहुतांश औषधांचे परीक्षण उंदरांवर केले जाते, जे मानवांकरता उपयुक्त ठरत नाही, मिनी-ब्रेन या समस्येवर तोडगा काढू शकतो. हे नव्या औषधांचे परीक्षण करण्याची सोपी आणि अचूक पद्धत ठरू शकते, यामुळे उपचारपद्धतीचा यशाचा दर वाढू शकतो. या तंत्रज्ञानाद्वारे भविष्यात प्रत्येक रुग्णासाठी खास औषधे तयार केली जाऊ शकतात, असे भारतीय वैज्ञानिकांचे सांगणे आहे.
भारतात कसा होणार लाभ
आयएचबीएएसमध्ये प्राध्यापक आणि गेरियाट्रिक सायकियाट्रिस्ट डॉ. ओम प्रकाश यांनी मिनी-ब्रेन अल्झायमर आणि ऑटिज्म यासारख्या जटिल आजारांना विस्तृपणे समजून घेण्याची संधी देणार असल्याचे सांगितले आहे. भारतात एकीकडे मानसिक आरोग्य सेवांची कमतरता आहे, अशा पार्श्वभूमीवर हे तंत्रज्ञान रुग्णांसाठी अचूक आणि किफायतशीर उपचार मिळविण्यास मदत करू शकते. यामुळे रुग्णांना लाभ होण्यासह भारत आरोग्य देखभाल संशोधनात आघाडी मिळवू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.
मिनी-ब्रेन ठरणार उपयुक्त
प्रयोगशाळेत निर्मित हा मिनी-ब्रेन औषधांचे परीक्षण करण्यास मदत करेल, तसेच कुठले औषध कोणत्या रुग्णासाठी सर्वात चांगले ठरेल, असे सांगू शकणार आहे. याचबरोबर भविष्यात हे तंत्रज्ञान ‘ऑर्गनाइज्ड इंटेलिजेन्स’च्या दिशेने जाऊ शकते. जेथे मेंदूसारखे मॉडेल बायो-कॉम्प्युटिंगमध्ये वापरला जाऊ शकते. परंतु या तंत्रज्ञानाच्या नैतिक पैलूंवर लक्ष देणे आवश्यक असल्याचे वैज्ञानिक सांगत आहेत.









