हॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री रेबेका रोमिन पुन्हा एकदा चर्चेत आहे. यावेळी तिचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘एवेंजर्स : डूम्सडे’मधून ती स्वत:ची जुनी व्यक्तिरेखा मिस्टिकच्या स्वरुपात वापसी करत आहे. या व्यक्तिरेखेने 2000 साली एक्स-मेन सीरिजची सुरुवात केली होती आणि आजही चाहते याला सर्वात स्मरणीय भूमिका मानतात. या चित्रपटासाठी विचारणा झाली असता मी चकित झाले. ही ऑफर माझ्यासाठी उत्सुकता वाढविणारी होती. सध्या मी या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र असल्याचे रेबेकाने सांगितले आहे. रेबेकाने स्वत:च्या कारकीर्दीच्या प्रारंभी मिस्टिक यासारख्या धोकादायक व्यक्तिरेखा प्रभावीपणे साकारल्या होत्या.
परंतु आता ती ‘स्टार ट्रेक : स्ट्रेंज न्यू वर्ल्ड्स’मध्ये कमांडर ऊना चिन-राइलीच्या भूमिकेत दिसून येत आहे. मिस्टिक आणि ऊना दोन्हींमध्ये एक समान गोष्टी आहे, दोघी कुठल्या न कुठल्या प्रकारे म्युटेंट आहेत. मिस्टिक स्वत:ची ओळख गर्वाने स्वीकारते, तर ऊना ती लपविण्याचा प्रयत्न करते. मिस्टिग एक उग्र आणि धोकादायक व्यक्तिरेखा आहे. तर ऊना आतून अत्यंत भावुक असल्याचे रेबेकाने सांगितले. एवेंजर्स : डूम्सडे केवळ रेबेकाच्या वापसीसाठी नव्हे तर स्वत:च्या कलाकारांमुळेही चर्चेत आहे. या चित्रपटात रॉबर्ट डाउनी ज्यूनियर पुन्हा एकदा एमसीयूत दिसून येईल. परंतु यावेळी सुपरविलेन डॉक्टर डूमच्या स्वरुपात. याचबरोबर चित्रपटात पॅट्रिक स्टीवर्ट, इयान मॅककेलन, जेम्स मार्सडेन यासारखे जुने एक्स-मेन कलाकारही सामील आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.









