दापोली :
गोकुळ अष्टमी काही दिवसांवर आली असल्याने दापोली बाजारपेठांमध्ये दहीहंडीसाठी लागणारी हंडी अर्थात मडकी विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत.
गोपाळकाल्यानिमित्त दापोली शहरात दरवर्षी मडकी विकण्यासाठी येतात. यात मातीची साधी तसेच रंगवलेली मडकी असतात. काहीजण दोरीत बांधलेली मडकी घेऊन जातात. यासाठी लागणारी साधी व रंगवलेली मडकी विक्रीसाठी दापोली बाजारपेठेत उपलब्ध झाली आहे. यावर्षी ९० पासून १५० ते २५० पासून ३५० पर्यंत लहान मोठ्या आकाराच्या मडक्यांची किमंत असल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात आले.








