वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय नौदल 11-12 ऑगस्ट रोजी अरबी समुद्रातील सागरी क्षेत्रात युद्धसराव करणार आहे. हा लष्करी सराव नियमित कारवायांचा भाग असला तरी या माध्यमातून शत्रूराष्ट्रासह इतर बऱ्याच देशांचे लक्ष वेधून घेतले जाईल. भारताच्या या सरावादरम्यान पाकिस्ताननेही ‘नोटम’ जारी करत सरावाची तयारी दर्शवल्याचे समजते. भारत आणि पाकिस्तानचे नौदल एकमेकांपासून सुमारे 60 नॉटिकल मैल अंतरावर हा सराव करतील. हा सराव दोन्ही देशांमधील वाढलेली नौदल उपस्थिती आणि धोरणात्मक स्थिती अधोरेखित करतो. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये कटुता निर्माण झाली असतानाच हा युद्धाभ्यास रंगणार आहे.









