वृत्तसंस्था/ चेन्नई
येथे सुरु असलेल्या आशियाई सर्फिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत पुरुषांच्या विभागात भारताच्या रमेश बुधिहाळने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारा रमेश हा पहिला भारतीय स्पर्धक आहे.
रमेशने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत फिलिपिन्सच्या सांचेसला मागे टाकले. रमेशने 14.84 गुण तर सांचेसने 12.80 गुण नोंदविले. इंडोनेशियाच्या पेजार अरियानाने 13.83 गुण घेत तिसरे स्थान मिळविले. मुलांच्या 18 वर्षाखालील वयोगटात भारताच्या पी. हरिश आणि आद्या सिंग यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. भारताच्या दमयंती श्रीरामचेही आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले आहे.









