आरपीडी महाविद्यालयात ‘जर्मन भाषा अन् नोकरीच्या संधी’ कार्यशाळेचे आयोजन
बेळगाव : आरपीडी कॉलेजमध्ये ‘जर्मन भाषा आणि नोकरीच्या संधी’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना अनिश सुरेश म्हणाले की, शाळा असो वा कॉलेज तसेच अगदी इंजिनिअरिंगमध्येही सध्या एक टेंड प्रचंड गाजतो आहे, तो म्हणजे इतर देशांपैकी कोणत्याही एका देशाची भाषा शिकण्याचा टेंड सुरू झाला आहे. विद्यार्थ्यांना फ्रान्स, जपान, चीन, जर्मनी अशा देशांच्या भाषा महत्त्वाच्या वाटतात. कोणत्याही एका देशाची भाषा निवडून ती शिकावी लागते.
मातृभाषेवर आपल्या विद्यार्थ्यांचे प्रभुत्व असते. मात्र फॉरेन लँग्वेज शिकण्याचा टेंड आता नवीन आहे. विदेशी भाषा शिकण्याचा टेंड आजकालच्या काळात संपूर्ण जगभरात कुठेही शिक्षणासाठी जायची इच्छा असेल तर तिथली भाषा येणे आवश्यक आहे. तसेच आयटी सेक्टरमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे विद्यार्थ्यांना जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात क्लायंट्सशी संवाद साधावा लागतो. या कारणांमुळे तुम्हाला एखादी फॉरेन लँग्वेज येणं आवश्यक आहे.
याप्रसंगी केदार मेघे यांनी सुद्धा जर्मन भाषेचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी संदीप तेंडुलकर, आरपीडी पीयू प्राचार्या तृप्ती शिंदे, पदवी प्राचार्य डॉ. अभय पाटील व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. साईशीला जाडे यांनी केले. ज्योती सत्तेगिरी यांनी आभार मानले.









