बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठाची पीएमयूएसएचए-एमईआरआय योजनेंतर्गत विद्यापीठाची अंतर्गत समिती जिल्हा कायदा सेवा प्राधिकार व संगोळ्ळी रायण्णा कॉलेज यांच्यावतीने महिलांचे कायदेशीर हक्क या विषयावर एक दिवसीय जागृतीपर कार्यशाळा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव संतोष कामगौडा होते.
कायदा सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष टी. ए. इनवळ्ळी यांनी उद्घाटन केले व महिलांच्या कायदेविषयक हक्कांबद्दल सविस्तर माहिती दिली. समारोपामध्ये संतोष कामगौडा यांनी मानवी जीवनातील कायद्यांचे महत्त्व, महिला सक्षमीकरण, महिलांचे हक्क व कर्तव्ये याबद्दल विवेचन केले. दुसऱ्या सत्रात प्राधिकारचे सचिव व न्यायाधीश संदीप पाटील यांनी मानवी हक्क, स्त्रियांचे हक्क याबद्दल संवाद साधला. प्रतिभा जोशी व सुजाता गौंडाडकर यांनीसुद्धा मार्गदर्शन केले.
प्रारंभी स्नेहा कांबळे हिने स्वागत गीत सादर केले. अंतर्गत समितीच्या सदस्य डॉ. देवता गस्ती यांनी स्वागत केले. समितीच्या अधिकारी डॉ. मनीषा नेसरकर यांनी प्रास्ताविक केले. नोडल अधिकारी डॉ. नंदिनी देवरमनी यांनी आभार मानले. रूपा बडवण्णवर हिने सूत्रसंचालन केले. याप्रसंगी प्रभारी प्राचार्य अर्जुन जंबगी, अंतर्गत समिती सदस्य रेश्मा डांगे, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.









