सातारा :
सातारा शहरात शहर पोलीस ठाण्याचे हद्दीतील अनेकांचे मोबाईल गहाळ झाले होते. संबंधितांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्याच तक्रारीच्या अनुषंगाने शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने राज्य आणि परराज्यातून मोबाईलचा शोध घेऊन ते हस्तगत केले. असे ९ लाख रुपयांचे ४१ मोबाईल हस्तगत करण्यात आले, अशी माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी दिली.
पोलीस अधिक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागिय अधिकारी विभाग साताराचे राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांनी मोबाईल शोध घेण्याच्या सूचना डी.बी. पथकास दिल्या होत्या. त्या अनुषंगाने डी. बी. पथकाने सी.ई.आय. आर. पोर्टल व इतर तांत्रिक बाबीचे आधारे महाराष्ट्रातून व इतर राज्यातून हस्ते परहस्ते मोबाईल धारकांशी वारंवार संपर्क करून चिकाटीने मोहीम राबविल्याने सातारा शहरातून गहाळ झालेले एकूण ९ लाख रुपये किंमतीचे ४१ स्मार्ट फोन मोबाईल हस्तगत करण्यात यश आले. ही मोहिम वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारे सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे सातारा शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांनी सांगितले आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधिक्षक वैशाली कडुकर उपविभागिय अधिकारी सातारा विभाग सातारा राजीव नवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक श्याम काळे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पो. हवा. सुजीत भोसले, निलेश जाधव, निलेश यादव, विक्रम माने, पो.ना. पंकज मोहिते, पो.कॉ. सचिन रिटे, विशाल धुमाळ, संतोष घाडगे, सागर गायकवाड, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, तुषार भोसले, सुहास कदम सायबर पोलीस ठाणेकडील पो. कॉ. महेश पवार, ओमकार डुबल, प्रशांत मोरे, यशवंत घाडगे, रणजित कुंभार, रामदास भास्करवाड, रेश्मा तांबोळी यांनी केलेली आहे.








