बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा शाळेच्या माधव सभागृहात विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत विद्याभारती बेळगांव जिल्हा संत मिरा स्कूल आयोजित विद्याभारती प्रांतीय व क्षेत्रीय मलखांब स्पर्धेला प्रारंभ झाला. या स्पर्धेत कर्नाटक, तेलंगाना आंध्र प्रदेश शाळेच्या प्राथमिक व माध्यमिक मुला मुलींच्या संघांचा समावेश होता. स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून जनकल्याण ट्रस्टचे लक्ष्मण पवार विद्याभारती बेळगाव जिल्हा अध्यक्ष माधव पुणेकर संत मीरा माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष प्रकाश पुजारी, संत मीरा हिंडलगा शाळेचे सचिव प्रसाद कुलकर्णी, संत शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, संत मीरा गणेशपुर शाळेच्या मुख्याध्यापिका आरती पाटील ,उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव तर अध्यक्षस्थानी कर्नाटक विद्याभारती राज्य अध्यक्ष परमेश्वर हेगडे उपस्थित होते
प्रारंभी पाहुण्याचे हस्ते मलखांबचे पूजन व श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. व खेळाडूंची ओळख करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित पाहुण्यांच्या समोर कर्नाटक व आंध्रप्रदेश व तेलंगणाच्या खेळाडूंनी मलखांबची प्रत्यक्षिके सादर केली या मलखांब व रोप मलखांब यावर मुला व मुलीनं आपली कौशल्य दाखवीत उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. याप्रसंगी मलखांब प्रमुख अनुराधा पुरी, श्वेता पाटील ,पंच सुरज देसुरकर अभी पिसाळे, चंद्रकांत पाटील, शिवकुमार सुतार, यश पाटील आदी उपस्थित होते. स्पर्धेत कर्नाटक तेलंगाना आंध्र प्रदेश या राज्याच्या शालेय संघानी भाग घेतला आहे.









