कोल्हापूर / विद्याधर पिंपळे :
श्रावण सुरू झाल्याने, येथून पुढे सर्व सण सुरू होत आहेत. याच पार्श्वभूमीवर नारळाचा तुटवडा जाणवू लागला आहे. आधी अॅडव्हान्स नंतर 15 दिवसांनी उपलब्ध झाल्यास नारळाची आवक होणार. अशी स्थिती सद्या कोल्हापूरातील नारळ व्यापाऱ्यांची असल्याचे सांगण्यात आले.
या आठवडयात साखरेच्या दरात किलोमागे दोन रूपयाची वाढ झाली आहे. श्रावण सुरू झाल्याने, बाजारात उपवासासाठी लागणाऱ्या पदार्थांची , वस्तूंची खरेदी सुरू झाली आहे. उतर भारतामध्ये पाऊस सुरू असल्याने, सुकामेव्याची आवक थांबली आहे. चार दिवसात सुकामेवा दर समजू शकणार आहे.
- नारळासाठी अॅडव्हॉन्स पेमेंट
सणाच्या काळात केरळ,कर्नाटक येथून नारळाची मोठी आवक होत असे.नारळ ट्रक दारात येताच पैसे तात्काळ पेमेंट होत असे. पण आता हे चित्र बदलले आहे. नारळाचा तुटवडा असल्याने, आता पैसे अॅडव्हॉन्स भरून,दोन आठवडयाची प्रतिक्षा करावी लागत आहे. पैसे भरून देखील नारळ दारात येण्यासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. यामुळे नारळाचा दर दामदुप्पट झाला आहे. यामुळे बाप्पाचे तोरण,मोदक आता महागले आहे.
नारळाचे किरकोळ दर पुढीलप्रमाणे असल्याची माहीती होलसेल नारळ व्यापारी रोहन नासिपुडे यांनी दिली आहे. लहान नारळ 30 ते 40 रूपये नग असा आहे. तोरण ,पूजेसाठी लागणाऱ्या मध्यम आकाराच्या नारळाचा दर 50 रूपये तर हॉटेलसाठी लागणाऱ्या बोळ नारळाचा दर 70 रूपये असा आहे.
- साखर महागली
सद्या सर्व सण सुरू झाल्याने साखरेची मागणी वाढत आहे. यामुळेया आठवडयात साखरेच्या दरात किरकोण् वाढ झाली आहे. 44 रूपये किलो असणारी साखर आता 46 रूपये झाली आहे. कांही दिवसापुर्वी 42 रूपये किलो असणारी साखर 44 रूपये झाली होता. यामुळे साखरेचा दर स्थिर होता. पण या आठवडयात साखर किलोमागे दोन रूपयांनी महागली आहे.
- बाप्पाच्या खिरीसाठी खपली गव्हाची मागणी
बाप्पाच्या नैवेदासाठी खपली गव्हाच्या खिरीला मोठा मान असतो. यासाठी आता बाजारपेठेत खपली गहू व पॉलिस खिरीच्या गव्हाची मागणी वाढली आहे. हा गहू आरोग्यास विशेषत: डायबेटीस रूग्णासाठी खपली गहू खाण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. मोठया शहरामधून पंचकर्म केंद्र,योग्य सेंटर, डाएट,फिटनेससाठी खपली गव्हाची मागणी वाढत आहे. कोल्हापुरात आज खपली गव्हाचा किरकोळ किलोचा दर शंभर रूपये किलो तर पॉलिस खिरीच्या गव्हाचा दर 120 रूपये किलो आहे.
- पावसामुळे सुकामेव्याची वाहतूक थांबली
सणासाठी सुकामेव्याची मोठी मागणी असते. पण भारत-पाकिस्थान व्यापार बंद आल्याने, सुकामेवा दुसऱ्या मार्गाने भारतात येत आहे. यामुळे याच्या दरात ही वाढ झाली आहे. सद्या उतर भारतामध्ये मोठया प्रमाणावर पाऊस सुरू असल्याने, सुकामेव्याची वाहतूक थांबली आहे. यांनतर आवक सुरू झाल्यानंतर याचा दर समजून येणार असल्याची माहीती सुकामेवा विक्रेते बबन महाजन यांनी सांगितले.
- उपवास वस्तूंचे दर पुढीलप्रमाणे
आज किरकोळ उंची शाबूचा दर 68 तर मध्यम प्रतीच्या शाबूचा दर 60 रूपये किलो असा आहे. तर वरी तांदळाचा किरकोळ दर 90 ते 100 रूपये किलो आहे. यासाठी लागणाऱ्या शेंगदाण्याचा दर 120 ते 140 रूपये किलो असा आहे.
- उपवासाच्या पदार्थांचे दर पुढीलप्रमाणे
बटाटा चिवडा: 240, पांढरा शाबू चिवडा: 240, लाल शाबू चिवडा: 240, फिंगर चिप्स बटाटा: 240, बटाटा वेफर्स: 280, 12 नग असलेल्या राजगिरी लाडूचे पॅक 20 रूपये आहे. फळांचे दर ही चढेच असून येत्या दोन दिवसात त्यांच्या दरात वाढ होऊ शकते.
खजूर हा आखाती देशातून आयात होत असते. पण भारत-पाकीस्तान युध्दाचा परिणाम व्यापारावर झाला आहे. भारतात येणारी खजूर आता थोडी महाग झाली आहे. श्रावणांनतर नवरात्रीसाठी खजूरची मागणी वाढत असते. सद्या खजूरचा दर प्रतवारीनुसार 90 ते 300 रूपये झाली आहे.
- किराणा दर
सद्या गव्हाचा व ज्वारीचे दर स्थिर आहेत. प्रतवारीनुसार गहू 40 ते 44 तर ज्वारी 44 .ते 58 रूपये असा दर आहे. गूळ: 55,शाबू:60 ते 68,शेंगदाणे 120 ते 140, वरी 90 ते 100, रवा: 44,मेदा:44,आटा:44 रूपये असा आहे.








