मालवण । प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील मालडी गावचे सुपुत्र डॉ. श्रीशैल पराडकर यांनी वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित DM (Endocrinology) या सुपर स्पेशालिटी परीक्षेत महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक मिळवून मालवण व सिंधुदुर्ग जिल्ह्याचा झेंडा उंचावला आहे.ग्रँट मेडिकल कॉलेज, सिव्हिल सूरत आणि नायर हॉस्पिटल येथे त्यांनी आपला शैक्षणिक प्रवास पूर्ण केला. एंडोक्रायनोलॉजीसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात त्यांनी मिळवलेले यश हे त्यांच्या बुद्धिमत्ता, चिकाटी आणि सामाजिक भानाचे प्रतीक आहे.
डॉ. पराडकर हे मालडीतील प्रसिद्ध गोंनबा घराण्यातील असून, श्री. हरिदास व सौ. श्रद्धा पराडकर यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या पत्नी डॉ. अनी पटेल पराडकर या स्वतः MD असून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.
Previous Articleआशा फडतरेंचे पताके चित्रप्रदर्शन ११ पासून जहाँगीर गॅलरीमध्ये
Next Article कोल्हापूरकर लढले अन् जिंकले…









